Close

बेडरूमची स्वच्छता : भाग तिसरा (कपाट आणि कपड्यांची आवराआवर)

  • Gha Gharacha

माझे बाबा पूर्वी मला म्हणायचे, “मोहन रानडे (म्हणजे ‘मोह’ नरा नडे 😉 ) होऊ न देता कपड्याचं कपाट आवरून दाखव. निम्मं कपाट रिकामं होईल तुझं.”आपल्याकडे, बेडरूममध्ये असणारी खुर्ची, कपडे वाळत घालण्याचं स्टॅन्ड, दारामागचे हँगर्स किंवा हूक्स ह्या सगळ्यांकडे ‘कपड्यांचा पसारा करण्यासाठीची हक्काची जागा’ म्हणून बघितलं जातं. काही जणं तर, कित्येकदा त्याच पसाऱ्यातून एखादा शर्ट/ड्रेस हुडकून बाहेर घालून जातात आणि परत तिथेच आणून ठेवतात, त्याच पसाऱ्यात. बऱ्याचदा आपण त्या कपड्यांच्या ढिगाकडे दुर्लक्ष करतो. कपाट व्यवस्थित आवरलेलं नसेल, न लागणारे कपडे बाजूला काढलेले नसतील तर बाहेर कुठे जायचं म्हणलं की अंगावर काटा येतो. आज कोणता ड्रेस घालू ? कोणता ड्रेस मला बसेल ? कपाट भरलेलं असूनही एकही बरा ड्रेस सापडत नाही, ड्रेस सापडला तर सोबतच्या अक्सेसरिज सापडत नाहीत असं सगळं गुंतागुंतीचं होऊन बसतं. हे सगळं टाळण्यासाठी आजपासून आपण बघणार आहोत कपाटाची स्वच्छता आणि आवराआवर.
 
१. कपाटाची स्वच्छता करताना :
कपाटाची स्वच्छता करताना स्वच्छता सगळ्या वस्तू/ कपडे एकदम बाहेर काढले तर खूप पसारा होतो आणि मग काही सुचेनासं होतं. त्यामुळे एक एक कप्प्याची स्वच्छता करावी. सगळ्यात वरच्या कप्प्यापासून सुरुवात करत खालच्या कप्प्यांपर्यंत यावं. स्वच्छता करताना, आत ठेवलेले सगळे कपडे/वस्तू बाहेर काढा आणि बेडवर मांडून ठेवा. बेडवर ठेवल्याने आवरण्यासाठी मोठी जागा मिळेल (आणि सगळं स्वच्छ झाल्याशिवाय झोपता येणार नाही 😉 ). आधी सगळ्या कप्प्यांमधली धूळ स्वच्छ करा (जर घरी व्हॅकयूम क्लीनर असेल तर त्याचा वापर करा म्हणजे कोपऱ्यात असणारी धूळसुद्धा निघून जाईल) आणि कोरड्या नॅप्कीनाने पुसून घ्या. नंतर संपूर्ण कप्प्यावर क्लीनर मारून ओल्या फडक्याने पुसून घ्या. मग परत कोरड्या फडक्याने पुसून घ्या आणि कप्पा पूर्ण वाळू द्या. ओलं असताना त्यात समान ठेवलं तर बुरशी लागण्याची शक्यता असते, कदाचित कपड्यांचा रंगसुद्धा लागू शकतो. संपूर्ण वाळल्यानंतर खाली पेपर, लायनर ठेवा.
आता बाहेर काढलेल्या सगळ्या कपड्यांचे वर्गीकरण करा.

  • वापरणार आहोत असे/ ठेवायचे कपडे (जे कपडे आपण गेल्या वर्षभरात वापरले नाहीत ते कपडे पुढेही लागणार नाहीत त्यामुळे ते परत कपाटात ठेऊ नका (स्वेटर किंवा काही सीझनल कपडे वगळता))
  • धुवायला टाकायचे कपडे
  • उसवलेले, बटण तुटलेले किंवा ज्यांना डागडुजी करावी लागेल असे कपडे
  • खराब झालेले, विटलेले, विरलेले, असे टाकून द्यायचे कपडे
  • चांगले कपडे पण जे आता आपल्याला बसत नाहीत किंवा आपण वापरणार नाहीत असे डोनेट करायचे कपडे
  • जे कपडे आपल्याला बसतील का नाही याची शंका आहे किंवा एकदा घालून बघितल्यानंतर ठरवायचं आहे की हे कपडे ठेवायचे की नाही, अश्या कपड्यांचा पण एक गठ्ठा बनवा (जर ते खूप असतील तर). सगळे कपडे लगेच घालून बघत बसायला लागलो तर आवरणं बाजूला राहतं आणि कपडे घालून बघितल्यानंतर परत आवरायचा कंटाळा येतो.

 
२. कपाटात काय काय आणि कसं ठेवायचं :
आता जे कपडे कपाटात परत ठेवायचे आहेत त्याची साठवणूक कशी करायची ह्याबाद्डल बोलूया. कपड्यांची साठवणूक करताना ऋतूचा, ऋतुबदलाचा विचार करून कपड्यांची साठवणूक करा. खरंतर प्रत्येका ऋतुबदलानंतर कपड्यांचं कपाट एकदा तरी आवरलं पाहिजे. आपण उन्हाळ्यात पातळ, सुती, फेंट रंगाचे कपडे घालतो. तर पावसाळ्यात जाड, अंगाला चिकटणार नाहीत असे गडद रंगाचे कपडे वापरतो. हिवाळ्यामध्ये जाड, लोकरीचे कपडे वापरतो. त्यामुळे कपाटात कपडे ठेवताना अश्याच क्रमाने किंवा पद्धतीने ठेवावेत. त्या त्या ऋतूमधली त्या कपड्यांची गरज संपल्यावर स्वच्छ धुऊन इस्त्री करून त्याचा एक गठ्ठा करून, तो गठ्ठा सुती कपड्यात गुंडाळून कपाटात वरच्या बाजूला किंवा बेडमध्ये ठेऊन द्यावा. यामुळे रोज वापरणारे कपडे ठेवण्यासाठी कपाट रिकामं होईल.
प्रत्येक गोष्ट ठेवण्यासाठी त्याची एक जागा ठरवा. प्रत्येका गोष्टीला त्याची विशिष्ठ जागा असेल तर गोष्टी इकडे तिकडे ठेवल्या जाणार नाहीत. कपाट लावताना, आपल्याला जास्तीत वेळा कोणते कपडे लागणार आहेत आणि त्यांचा गठ्ठा कुठे ठेवला तर आपल्याला सोईचं जाणार आहे हे आपले आपण ठरवायचं (जर रोज कुर्ते वापरत असू तर वरच्या कप्प्यात कुर्ते ठेवायचे आणि खालच्या कप्प्यात पँट्स ठेवायच्या). आपल्याला वापरताना सोपं जायला हवं इतकंच. Out of site out of mind हा नियम आपल्या सगळ्यांना माहिती आहे. ज्या वस्तू कपडे रोज वापरायचे आहेत ते नजरेआड ठेवू नका. त्यामुळे मागे ठेवलंय म्हणून न दिसल्याने ते कपडे वापरले जात नाहीत. कपाटातल्या कपड्यांचं वर्गीकरण करताना १. कपड्याच्या पोतानुसार (म्हणजे सिल्क, कॉटन इत्यादी) २. कपड्यांच्या रंगानुसार ३. आपण ते कपडे कुठे घालून जातो त्यानुसार (म्हणजे ऑफिसला, कार्यक्रमांना, कॅज्युअल) अश्या पद्धतीने वर्गीकरण करू शकतो. माझे सगळे ड्रेस एकाच स्लीव्ज पॅटर्नचे असतात. जर तुम्ही स्लीवलेस, हाफ स्लीव्ज असं वापरत असाल तर त्यानुसारसुद्धा कपडे वेगळे करून ठेवू शकता.
 

साड्या कुर्ते / टॉप बॉटम्स इतर रोजचे कपडे
काठा पदराच्या भरजरी साड्या (शक्यतो आपण स्वतःच्या किंवा जवळच्या लोकांच्या कार्यकमांना वापरतो अश्या साड्या) ऑफिससाठीचे फॉर्मल कुर्ते (लांब उंचीचे ) सलवार ओढण्या, स्कार्फ घरात घालायचे कपडे
ट्रॅडिशनल पण खूप भरजरी नसणाऱ्या साड्या ऑफिससाठीचे फॉर्मल कुर्ते (गुडघ्या पर्यंत उंचीचे ) लेगीन ब्लेजर, जॅकेट्स इतर कपडे
डिझायनर साड्या किंवा जरी काठ नसणाऱ्या साड्या कायर्क्रमांसाठी जाताना वापरायचे कुर्ते फॉर्मल बॉटम्स (ट्राउझर, पँट्स, स्कर्ट्स इत्यादी ) लेहेंगा, चनिया चोली सारखे ड्रेस जिमला जात असल्यास ते कपडे
रोज वापरायच्या साड्या पंजाबी सूट्स, सलवार कमीज कॅज्युअल बॉटम्स ( जीन्स, केप्री, स्कर्ट्स, शॉर्ट्स, डंगरी, हेरम इत्यादी)   नाईट ड्रेस
सर्व साड्यांसाठीचे पेटीकोट ऑफिससाठीचे फॉर्मल शर्ट/ टॉप     सॉक्स
साड्यांवरचे ब्लाउज जीन्सवर वापरायचे टॉप/ टी शर्टस, कॅज्युअल शर्टस, टॅन टॉप्स      
वेगवेगळ्या सिल्कच्या साड्या कॅज्युअल वन पिस, लॉंग ड्रेस, शोर्ट ड्रेस      
  पार्टीवेअर टॉप / ड्रेस      

 
(हे वर्गीकरण सर्वसाधारण पद्धतीने केले आहे. आपापल्या गरजा आणि सवाईनुसार आपण त्यात बदल करू शकता.)
 
शक्यतो वेगवेगळ्या उंचीच्या लेगीन वेगवेगळ्या करून ठेवाव्यात (म्हणजे घोट्यापर्यंतची चुण्या न पडणारी, संपूर्ण लेन्थची चुण्या पडणारी, 3 / 4th लेगीन वगैरे). जर साड्यांवर मिक्स अँड मॅच करून ब्लाउज वापरत असू तर, सगळ्या ब्लाउजचा एका वेगळा गठ्ठा करावा पण जर तसं वापरत नसू तर ज्या त्या साडीच्या घडीमध्ये त्या त्या साडीचे ब्लाउज ठेऊन द्यावे म्हणजे आयत्यावेळी शोधाशोध होणार नाही. अश्या पद्धतीने कपड्यांचे गठ्ठे तयार करताना वेगवेगळ्या रंगाचे कपडे वेगवेगळा गठ्ठा करून ठेवावे (किंवा १. पांढरा-पिवळा, २. लाल-हिरवा- निळा, ३. गडद नीळा – चॉकलेटी- काळा अश्या रंगांचे गठ्ठे करू शकता) कपडे रंगानुसार लावले तर शोधणं, आणि ‘आज कोणता ड्रेस घालू’ हे ठरवणं सोपं जातं.
 
जर कमी जागा उपलब्ध असेल तर शक्य असतील तितक्या वस्तू/ गोष्टी घडी घालून किंवा गुंडाळून/ रोल करून ठेवाव्यात. हँगरला अडकवल्याने जागा जास्त लागते आणि कदाचित अडकवल्याने (स्वेटरसारखे ) कपडे ताणले जाऊ शकतात किंवा खराब होऊ शकतात. अगदीच एखाद्या कोपऱ्यात उभी जागा राहिली असेल तर मग अश्या ठिकाणी कमरेचे बेल्ट किंवा स्कार्फ अडकवायला हरकत नाही. खूप जणं कपाटाच्या दारांनासुद्धा आतल्या बाजूने हूक लावतात आणि त्यावर ओडण्या, स्कार्फ अडकवतात. मला स्वतःला हे अजिबात आवडत नाही. दारावर जास्त वजन टाकलं की दाराची बिजागरी खराब होते आणि ते उतरायला लागतं. जर हँगरला कपडे अडकवून ठेवले तर खालची काही जागा रिकामी राहते. तिथे वेगवेगळ्या बास्केट/बॉक्स ठेवून वस्तू वेगवेगळ्या करून ठेवू शकता. त्यामुळे वस्तू सापडायला सोपं जातं आणि जागाही वाया जात नाही. जर कपाटात जागा कमी असेल तर मल्टी टीअर हँगर मिळतात. त्याचादेखील वापर करू शकता. ह्यापुढे आठवणीने एक पथ्य पाळा. नविन कपडे घेतले की त्याच प्रमाणात जुने, न लागणारे किंवा न वापरणारे कपडे काढून टाका म्हणजे जागा मोकळी होते.
 
हल्ली प्रत्येका प्रकारचे कपडे ठेवायला प्लास्टीकचे कव्हर्स बाजारात आले आहेत. खूप जणं एक गठ्ठा ठेवायला एक बॉक्स किंवा असे प्लास्टीकचे कव्हर्स वापरतात. मी अजूनतरी ते वापरत नाही. पण तुम्हाला त्याची गरज वाटत असेल तर वापरू शकता. जागा छोटी असल्यावर सगळ्या गोष्टी कपाटात मावत नाहीत. त्यामुळे काही गोष्टी किंवा रोज लागणाऱ्या वस्तू वर ठेवू शकतो. गोष्टी वर ठेवल्या की घर लगेच अस्ताव्यस्त दिसतं असं नाही फक्त त्या वस्तू व्यवस्थित पद्धतीने मांडाव्या लागतात इतकंच. योग्य (किंवा कलात्मक) पद्धतीने त्यांची मांडणी केली तर अश्या वस्तू घराच्या डेकोअरचा एक भाग होतात.
 
आज इथेच थांबू. पुन्हा भेटू पुढच्या सदरात.. लवकरच..!!

Related Posts

178 thoughts on “बेडरूमची स्वच्छता : भाग तिसरा (कपाट आणि कपड्यांची आवराआवर)

आपल्या प्रतिक्रिया/ कॉमेंट आपण इथे नोंदवू शकता

Your email address will not be published.

https://teamradioshack.com/ https://lit.link/en/totoagung2slot https://linkby.tw/qdal88.slot https://heylink.me/totoagung-situs-slot-online-gacor-terbaik-terpercaya/ https://linklist.bio/daftar-slot-4d https://heylink.me/bocoran-slot-gacor-hari-ini-situs-judi-online-restoslot4d/ https://ffm.bio/daftar-restoslot4d https://linkby.tw/totoagung2slot https://new.c.mi.com/th/post/114045 https://instabio.cc/cantiktoto-link https://s.id/Slotgacor4DOfficial https://naturalhistorymag.com/artdepartment/freebet-tanpa-deposit/ https://instabio.cc/link-daftar-amintoto https://heylink.me/restoslot4d-situs-pay4d-resmi-paling-gacor-indonesia/ https://idolink.com/slotgacor4dofficial https://allmy.bio/IDN-Slot-online-amintoto https://linkby.tw/amintoto-link-alternatif https://naturalhistorymag.com/content/spaceman-pragmatic/ https://wlo.link/@restoslot4d_gacor https://mssg.me/amintoto-slot-online https://akangzeyus.com/ https://heylink.me/cantiktoto-bandar-slot-online-gacor-resmi-idnplay/ https://heylink.me/link-alternatif-slot-pay4d/ https://idolink.com/qdal88slot https://ffm.bio/cantiktoto_slot https://heylink.me/agen-slot-demo-pragmatic-terpercaya-qdal88/ https://heylink.me/totoagung2-situs-slot-online-resmi-gacor-terpercaya-menang/ https://heylink.me/qdal88-situs-slot-gacor-online-freebet-tanpa-deposit/ https://solo.to/totoagung-slot https://lit.link/en/qdal88link https://heylink.me/restoslot4d-daftar-situs-slot-gacor-online-pay4d/ https://idolink.com/slothoki https://antartidargentina.com/ https://s.id/amintoto-slot-online https://blog.motorola.de/wp-content/slot-gacor-4d/ https://lynk.id/qdal88_slot_pulsa https://lynk.id/daftar_slot_4d https://instabio.cc/totoagung2-slot https://linkr.bio/restoslot4d-login https://idolink.com/totoagung2slot https://heylink.me/link-alternatif-slot-online-gacor-cantiktoto/ https://heylink.me/situs-slotgacor-4d-gampang-menang-maxwin/ https://ffm.bio/amintoto_official https://naturalhistorymag.com/content/slot-gacor/ https://lynk.id/totoagung_link https://allmy.bio/Slotgacor4dOfficial https://heylink.me/link-slot-gacor-totoagung2-pusat-game-terlengkap/ https://s.id/daftar-restoslot4d https://lynk.id/cantiktoto https://heylink.me/link-alternatif-situs-slot-gacor-online-amintoto/ https://heylink.me/slotgacor4d-situs-slot-online-gampang-menang-resmi-pay4d/ https://motivasiagung.com/ https://allmy.bio/cantiktoto-slot https://heylink.me/totoagung-situs-slot-online-resmi-pusat-pragmatic-play/ https://replit.com/@totoagung2slot https://mssg.me/cantiktoto_slot https://ffm.bio/qdal88_slot4d https://heylink.me/link-alternatif-resmi-restoslot4d-terbaik-gampang-menang https://wlo.link/@totoagung_slot https://lit.link/en/amintotoslotonline https://news-business.co.uk/slot-gacor-4d/ https://heylink.me/totoagung-situs-slot-online-resmi/ https://heylink.me/cantiktoto-situs-slot-online-terpercaya-gacor-lisensi-resmi/ https://heylink.me/agen-slot-pay4d/ https://jemi.so/amintoto-situs-slot-online-terpercaya https://new.c.mi.com/th/post/113199 https://raizeducacao.com.br/freebet-slot/ https://linkby.tw/cantiktotolink https://allmy.bio/qdal88-slot https://lynk.id/totoagung_slot https://jemi.so/cantiktotositusjudislotonlineterpercayaslotgacorpragmaticplayterbaikdiindonesia https://brainwavelove.com/ https://bandungheritage.org/ https://lynk.id/amintotoofficial https://solo.to/amintoto_official https://replit.com/@cantiktotogacor https://replit.com/@totoagungslot https://allmy.bio/totoagung2-slot https://linklist.bio/amintoto_link_daftar https://slotgacor4d.com/ https://ffm.bio/totoagung2_slot https://heylink.me/situs-slot-gacor4d-resmi-mudah-menang/ https://heylink.me/bocoran-situs-slot-gacor-gampang-menang-cantiktoto/ https://new.c.mi.com/th/post/116758 https://linklist.bio/qdal88-slot https://linkby.tw/totoagung-slot https://www.printersupportpro.us/blog/wp-content/uploads/slot-idn/ https://www.soulrichwoman.com/slotgacor4d/ https://skillscanada.bc.ca/idn-slot/ https://replit.com/@Slotgacor4doff https://linklist.bio/totoagung2_slot https://idolink.com/cantiktotoslot https://heylink.me/situs-slot-gacor-4d-gampang-menang/ https://heylink.me/daftar-slot-online-gacor-akun-vip-qdal88/ https://linktr.ee/totoagung2 https://naturalhistorymag.com/htmlsite/slot88-gacor/ https://mssg.me/qdal88-situs-judi-slot-paling-gacor-hari-ini https://heylink.me/slot-demo-pragmatic-qdal88-gratis-tanpa-deposit/ https://s.id/cantiktoto_slot https://linkby.tw/slotgacor4d.official https://heylink.me/cantiktoto/ https://heylink.me/link-alternatif-slot-pay4d/ https://linkr.bio/qdal88-slot4d https://idolink.com/amintotodaftarslotonline https://linklist.bio/Slotgacor4DOfficial https://linklist.bio/totoagung-slot https://heylink.me/qdal88/ https://meelink.bio/slot-gacor-maxwin https://mssg.me/totoagung2_slot https://heylink.me/daftar-slot-gacor-vip-khusus-situs-totoagung2/ https://s.id/totoagung-slot https://agungsport.com/ https://jemi.so/restoslot4dgacor https://heylink.me/totoagung_situs_deposit_pulsa/ https://produkvvip.com/ http://ptos.kimia.gov.my/css/sass/slot-pulsa/ https://heylink.me/qdal88.gampang.hoki/ https://heylink.me/SlotGacor4D/ https://heylink.me/bocoran-slot-gacor-pagi-siang-malam-hari-ini-amintoto/ https://instabio.cc/daftar-slot-4d https://solo.to/totoagung2_slot https://heylink.me/slot-gacor-online-rtp-tertinggi-situs-judi-amintoto/ https://skskismizamanli.cumhuriyet.edu.tr/image/demo/slot-pulsa/ https://wlo.link/@cantiktoto_slot https://lit.link/slotgacor4dnew https://ffm.bio/slotgacor4dofficial https://replit.com/@Resto4d https://solo.to/qdal88-slot https://heylink.me/totoagung2-situs-judi-slot-online-gacor-indonesia/ https://heylink.me/amintoto-daftar-situs-slot-online-gacor-indonesia/ https://heylink.me/restoslot4d-rtp-live-slot-gacor-tertinggi-hari-ini/ https://instabio.cc/Slotgacor4DOfficial https://allmy.bio/totoagung-slot https://naturalhistorymag.com/htmlsite/bo-slot-gacor/ https://linkby.tw/daftar_restoslot4d https://idolink.com/totoagungslot https://solo.to/resto-slot-4d https://heylink.me/link-slot-online-gacor-terpercaya-totoagung/ https://heylink.me/agen-slot-gacor-terkuat-totoagung-gampang-menang/ https://replit.com/@qdal88link https://ffm.bio/totoagung-slot https://heylink.me/cantiktoto-link-slot-online-gacor-terpercaya-resmi-idnplay/ https://solo.to/slotgacor4dofficial https://mssg.me/totoagung-situs-slot-online-paling-gacor https://heylink.me/link-alternatif-slot-freebet-qdal88/ https://instabio.cc/totoagung-slot https://instabio.cc/qdal88-slot https://lit.link/en/restoslot4dterpercaya https://heylink.me/amintoto-situs-slot-online-terpercaya-gampang-menang/ https://mssg.me/slotgacor4dofficial http://bpp346.bpp.police.go.th/slot-gacor-maxwin/ https://heylink.me/agen-slot-pay4d/ https://lit.link/en/cantiktotolink https://replit.com/@AmintotoDaftar https://mssg.me/slot-hoki-restoslot4d https://lynk.id/totoagung2_slot https://lynk.id/slotgacor4dofficial https://heylink.me/situs-slot-demo-gratis-totoagung2/