Close
 • Gha Gharacha

बेडरूमची स्वच्छता : भाग चौथा (मेकअप आणि अॅक्सेसरीज)

बाजारात नविन आलंय म्हणून आणि खरेदी करतेवेळी आपल्याला आवडलं म्हणून आपण खूप सारे नेलपेंट, लिपस्टिक, वेगवेगळ्या प्रकारचे क्रीम (नाईट क्रीम, मोईस्चरायजर, ) घेतो. (कधी कधी तर अचानक डोक्यात खूळ येतं… आजपासून आपण एकदम व्यवस्थित राहायचं…. म्हणून बाजारात जाऊन बऱ्याच प्रकारचे क्रीम, मेकअपचं समान असं बरंच काही घेऊनही येतो.) त्यातल्या काही गोष्टी आपण खरंच वापरतो. मात्र काही गोष्टी तश्याच पडून असतात कपाटामध्ये. अश्या गोष्टींची एक्सपायरी डेटसुद्धा उलटून गेलेली असते. अश्या गोष्टी त्वचेवर वापरणं तितकंसं योग्य नसतं. तेव्हा जादाचे/ खराब झालेले प्रॉडक्ट्स लगोलग टाकून दयावेत.
 

 • जर एक्सपायरी डेट उलटून गेलेली असेल तर
 • जर आपण ते प्रॉडक्ट्स वापरत नसू तर
 • जर ते प्रॉडक्ट आपल्याला लागत नसेल तर

 
ह्यापैकी काहीही झालेले असले तरीही हे सगळे मेकअपचे प्रॉडक्ट्स टाकून दयावेत. नेलपेंट खराब झाल्यावर जरा घट्ट व्हायला लागतं त्याचा रंग बदलायला लागतो, आतल्या बाजूने वाळायला लागतं, झाकण लवकर उघडत नाही. हे सगळं होत असेल तर ते टाकून द्यायची गरज आहे. रंग, कन्सीसटन्सी, वास जर बदलला असेल तर ती वस्तू खराब झालेली आहे असं गृहीत धरू शकता आणि अर्थातच ती काढून टाकू शकता किंवा त्याची योग्य विल्हेवाट लावू शकता. (ज्या बाटल्या उघडल्यानंतर नेलपेंटची कान्सीसटन्सी बदलली असेल, ते थीक झालेलं असेल, तर त्यात नेलपेंट थिनर घाला (पण त्याने शेड बदलते) नाहीतर सरळ टाकून द्या. जर ती शेड आवडली असेल तर कंपनी आणि शेडचा नंबर टिपून ठेवा.)
 
मेकअपच्या ह्या गोष्टींचे साधारणपणे कसे वर्गीकरण करता येईल आणि त्या किती दिवस वापरू शकतो ह्याबद्दल खाली तक्ता देत आहे. (हे मेकअपच्या प्रॉडक्ट्सवर असणाऱ्या तारखांचा अंदाज घेऊन तयार केले आहे. आपल्या प्रॉडक्ट्सवर एक्सपायरी डेट लिहिलेलीअसेल तर अर्थातच ती फॉलो करावी.)
 

आय मेकअप पावडर लिपस्टिक इतर नेलपेंट रोजच्या वस्तू
आय लायनर – १ वर्ष फाउंडेशन – १८ महिने लिपस्टिक टिकल्या नेलपेंट १-२ वर्ष (बाटली हलव्ल्यानंतर जर ते मिक्स होत नसेल तर याचा अर्थ ते खराब झालेलं आहे ) परफ्युम – २ वर्ष (थंड भागात ठेवायचं आणि सुर्प्रकाशापासून लांब ठेवायचं )
आय शॅडो – (लिक्विड १ वर्ष, पावडर २-३ वर्ष ) पावडर / कॉम्पॅक्ट – १ वर्ष लिप लायनर २ – ३ वर्ष कंगवा नेलपेंट रीमोव्हर – एक्स्पायर होत नाही डोक्याच्या क्लिप

 • मोठे कल्चर
 • टीक टॅक क्लिप्स
 • रबर बँड
 • हेअर बँड / बेल्ट
आयब्रो पेन्सिल – १-३ वर्ष कन्सिलर्स – २ वर्ष लिप ग्लॉस – २-३ वर्ष शार्पनर नेल फायलर फेस क्रीम/ नाईट क्रीम – ६ महिने
म्हसकरा – ३ महिने हाय लायटर / ब्लश लिप बाम – ५ वर्ष कापूस नेल कटर
 • बॉडी लोशन – २ वर्ष
 • सन्सक्रीम लोशन – एक वर्ष
 • anti एकने
  पावडर – २ वर्ष   टिशू पेपर    
  क्रीम   मेकअप रीमोव्हर / क्लिन्झर – २ वर्ष    
      ब्रश – २- ३ वर्ष    

 
बाकी अक्सेसरिज साठी जर कपाटात जागा नसेल तर बेडच्या आजूबाजूच्या ड्रॉवरचा वापर करु शकता. कधीकधी ड्रॉवरचे आकार अडनिडे असतात. अश्या वेळी ड्रॉवर डीवायडरचा वापर करु शकतो. त्यामुळे गोष्टी सुटसुटीत आणि वेगवेगळ्या करून ठेवता येतात. छोटे बिन्स, जुने बॉक्स, डबे, बास्केट्ससुद्धा रिसायकल करून वापरू शकता. गोष्टींचं जेवढं जास्त वर्गीकरण करता येईल तेवढंच ते सापडणं सोपं होईल.
 
ड्रेसिंग टेबल आवरताना :
 

 • लिपस्टिक आवरताना किंवा साठवणूक करताना अर्थातच रंगानुसार करावी पण त्यातही दोन भाग करून एक मॅट फिनिश असणाऱ्या लिपस्टिक आणि दुसऱ्या ग्लॉसी लिपस्टिक असं केलं तर सोईचं होऊ शकतं ( जर रोज मेक अप करून बाहेर पडत असू तर अश्या रोज लागणाऱ्या वस्तू, लिपस्टिकच्या शेड्स बाहेरच्या बाजूला ठेवायच्या म्हणजे वापरायला सोपं पडतं.)
 • हेअर ड्रायर मशीन्स, ब्लो ड्रायर्स, कर्लर्स इत्यादी गोष्टी असतील तर शक्यतो त्याच्या वायर्स मोकळ्या ठेवू नका. एकमेकांत अडकून बसतात आणि गुंता होतो. प्रत्येका मशीनचे वायर गुंडाळून ठेवून त्याला रबर लावा, वायरला लावण्यासाठी वेल्क्रो स्ट्रिप्स असतात त्यासुद्धा वापरू शकता.
 • मेकअपच्या सर्व गोष्टी उष्णता, सूर्यप्रकाश आणि दमट हवामानपासून दूर ठेवा. रंग, टेक्शर, कन्सीसटन्सी, वास जर बदलला असेल तर ती वस्तू खराब झालेली आहे असं गृहीत धरू शकता. जर गरज वाटत असेल तर हातावर थोडसं वापरून बघा आणि योग्य वाटलं तरच पुन्हा कपाटात ठेवा नाहीतर काढून टाका.
 • घड्याळांसाठी वेगळी जागा करून त्यात सगळी घड्याळ ठेऊन द्या. एकाच ठिकाणी असल्याने वस्तू सापडायला सोपे जाते आणि ‘कोणतं घालू ? ’ ह्यासाठी खूप शोधाशोध करावी लागत नाही.
 • ड्रेसिंगटेबलावरचा पसारा आवरून वस्तू जागच्या जागी ठेऊन द्यायच्या आणि सगळे सर्फेस मोकळे करायचे बेडरूममध्ये इतर गोष्टी किंवा इतर खोल्यांमधल्या गोष्टी पडलेल्या असतील पुस्तकं असतील तर ती जागच्या जागी ठेवायची.

 
बाकी अक्सेसरिज साठी जर कपाटात जागा नसेल तर आजूबाजूच्या ड्रॉवरचा वापर करा. कधीकधी ड्रॉवरचे आकार अडनिडे असतात. अश्या वेळी ड्रॉवर डीवायडरचा वापर करा. त्यामुळे गोष्टी सुटसुटीत आणि वेगवेगळ्या करून ठेवता येतात. छोटे बिन्स, जुने बॉक्स, डबे, बास्केट्ससुद्धा रिसायकल करून वापरू शकता. गोष्टींचं जेवढं जास्त वर्गीकरण करता येईल तेवढंच ते सापडणं सोपं होईल.
 
जर कमी जागा उपलब्ध असेल तर शक्य असतील तितक्या वस्तू/ गोष्टी घडी घालून किंवा गुंडाळून/ रोल करून ठेवाव्यात. हँगरला अडकवल्याने जागा जास्त लागते. अगदीच एखाद्या कोपऱ्यात उभी जागा राहिली असेल तर मग अश्या ठिकाणी कमरेचे बेल्ट किंवा स्कार्फ अडकवायला हरकत नाही. खूप जणं कपाटाच्या दारांनासुद्धा आतल्या बाजूने हूक लावतात आणि त्यावर ओडण्या, स्कार्फ अडकवतात. मला स्वतःला हे अजिबात आवडत नाही. दारावर जास्त वजन टाकलं की दाराची बिजागरी खराब होते आणि ते उतरायला लागतं. जागा छोटी असल्याने सगळ्या गोष्टी कपाटात मावत नाहीत त्यामुळे काही गोष्टी किंवा रोज लागणाऱ्या गोष्टी वर ठेवू शकतो. गोष्टी वर ठेवल्या की घर लगेच अस्ताव्यस्त दिसतं असं नाही फक्त त्या वस्तू व्यवस्थित पद्धतीने मांडाव्या लागतात इतकंच. योग्य (किंवा कलात्मक) पद्धतीने त्यांची मांडणी केली तर अश्या वस्तू घराच्या डेकोअरचा एक भाग होतात.
 
बाजारातून अत्यंत हौसेनी आणलेले कमरेचे बेल्ट्स, पर्स ह्यासारख्या लेदरच्या वस्तू आपण कपाटात ठेऊन देतो आणि नंतर लक्षात येतं की त्या न वापरल्यामुळे, नीट न ठेवल्यामुळे किंवा हवेमुळे लेदर खराब होतं आणि आपल्याला ते वापरता येत नाही. न लागणाऱ्या, वापरत नाही अश्या किंवा खराब झालेल्या पर्स, बेल्ट ताबडतोब काढून टाका. घरात निरनिराळ्या ठिकाणी आपले डोक्याचे बो, रबर बँड, क्लिप्स पडलेल्या असतात. त्या सगळ्या एका ठिकाणी एकत्र करून ज्या खराब झाल्या आहेत त्या काढून टाका. डोक्याचे बो जर कापडी असतील तर ते धुता येतात, तेही स्वच्छ करून घ्या. बॉबीपिन (जी आपण नेहमी केसांना लावण्यास्ठी वापरतो ती), टीकटॅक पिन्स, सेफ्टीपिन्स, बनाना क्लिप्स, हेअर क्लचर, आंबाड्याचे आकडे अश्या पद्धतीने वेगवेगळे करून ठेवा म्हणजे आयत्यावेळी सापडायला सोपं जातं.
 
वेगवेगळ्या गोष्टींसोबत घरात येणारे फ्री सॅम्पल्स, छोट्या तेलाच्या बाटल्या, पावडरचे डबे, प्लास्टीकचे डबे, बोल्स, हे पसारा वाढवणाऱ्या गोष्टींमध्ये येतात. त्यामुळे त्याची लवकरात लवकर विल्हेवाट लावली.
 
आज इथेच थांबू. पुन्हा भेटू पुढच्या सदरात.. लवकरच..!!

आपल्या प्रतिक्रिया/ कॉमेंट आपण इथे नोंदवू शकता

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!