Close

प्रवासापूर्वीची तयारी – भाग १

  • Gha Gharacha

परदेशी प्रवासाला निघालं की काय काय तयारी करायची, सोबत काय न्यायचं आणि काय नाही हा खूप पुढचा भाग झाला पण मुळात ट्रीप कशी प्लान करायची ह्याबद्दल सांगशील का ? असं मला विचारलं होतं. एखादी ट्रीप प्लान करताना, त्या ठिकाणाची माहिती काढताना मी काय आणि कसं शोधते हे पुढच्या काही लेखांमध्ये सांगणार आहे.

मला असं वाटतं प्रवाश्यांचे आपण दोन विभागात वर्गीकरण करू शकतो. एक म्हणजे टूरिस्ट कंपन्यांसोबत प्रवासाला निघणारे प्रवासी. ज्यात आखीव रेखीव मोजका प्रवास, मोजकी ठिकाणं, बहुतांश प्रसंगी भोज्ज्याला शिवून आणणारी आणि जास्त लेजर टाइम असणारी आयटनरी, संपूर्ण भारतीय पद्धतीचं जेवण, सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोणत्याही गोष्टीची जबाबदारी नाही, टूअर गाईड सांगतील तसं करायचं आणि दुसरं म्हणजे स्वतः प्रवासाची आखणी / नियोजन करणारे प्रवासी. आता सध्या ह्या दोन्ही पर्यांयांच्या मधला मार्ग म्हणून एक नवीन ट्रेंड आला आहे तो म्हणजे टूअर कन्स्ल्टेशनचा. आता संपूर्ण ट्रीप आपल्या इच्छेप्रमाणे आखून देणासाठी विविध टूअर कंपन्या उत्सुक असतात किंवा कुठे जाऊन काय काय करावं किंवा करू नये याबद्दलचं मार्गदर्शन करण्यासाठी, आयटनरी तयार करण्यासाठी सहाय्य करणारे प्रोफेशनल ट्रॅव्हलरसुद्धा अश्या सर्व्हिसेस देतात. मुख्य म्हणजे त्यांच्या अनुभवाचा उपयोग करून आपल्या पद्धतीने टूअर प्लान करण्यासाठी ते आपल्याला मदत करतात. माझा कल हा कायमच स्वतः प्रवासाची आखणी / नियोजन करण्याकडे असतो. ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये करावा लागणारा रीसर्च, त्यातून मिळणारी माहिती ह्या दोन्ही माझ्या अत्यंत आवडीच्या गोष्टी आहेत. त्यामुळेच मला त्याचा कधीही कंटाळा येत नाही आणि कितीही रिसर्च केला तरीही माझं पोट भरत नाही.

प्रवासाची आखणी, नियोजन हा सगळा उपक्रम सुरु करण्यापूर्वी एक अतिशय महत्वाची गोष्ट मला सांगावीशी वाटते ती म्हणजे, ‘आखूड शिंगी, बहुदुधी, बहुगुणी’ असं सगळं जुळून येणं अवघड असतं. त्यासाठी आपल्याला थोडे कष्ट घ्यावेच लागतात. ही सगळी शोध मोहीम करण्यात खूप वेळ आणि कष्ट खर्च होतात. आपलं बजेट सांभाळून जास्तीत जास्त गोष्टी त्यात बसवणं ही एक कसरतच असते. स्वस्त, सोयीचं, कमी कष्टाचं /त्रासाचं असं सगळं जुळून येणं जरा अवघडच असतं. त्यामुळे आपल्याला हव्या असणाऱ्या गोष्टींचा प्राधान्यक्रम आपणच ठरवावा लागतो. मी फक्त इतकंच म्हणेन की आपल्या प्रवासाची अशी आखणी करण्यात, तयारी करण्यातसुद्धा खूप मोठा आनंद दडलेला असतो. अमुक शहरापासून तमुक शहर किती लांब आहे? मग तिथे बस ने जावं की ट्रेनने की विमानाने? पैसे आणि वेळ कुठे जास्त खर्च होईल ? नाहीतर मग त्यापेक्षा आपण इकडे जाउयात का? ह्या सगळ्या चर्चा मला खूप हव्याहव्याश्या वाटतात. प्रवासाची आखणी करताना कोणत्या ठिकाणांसाठी / गोष्टींसाठी आपण जास्त वेळ देऊ शकतो आणि वेळ वाचवण्यासाठी कुठे आणि किती पैसे खर्च करू शकतो ह्याबद्दलचं प्रत्येकाचं एक गुणोत्तर असतं आणि त्यानुसार आपण निर्णय घेत असतो. माझा आत्तापर्यंतचा अनुभव असा आहे की आपण स्वतः आखलेली ट्रीप ही साधारणपणे टूअर कंपन्यांच्या जवळजवळ अर्ध्या किंमतीत होते आणि त्यांच्या आयटनरीपेक्षा २-४ गोष्टी जास्तच बघयला मिळतात.

अर्थात एखाद्या अनोळखी ठिकाणाबद्दल अंदाज बांधून, उपलब्ध असणाऱ्या माहितीवर नियोजन करण्यात थोडी रिस्कसुद्धा असतेच. एखाद्या ठिकाणी गोष्टी अपेक्षेप्रमाणे होत नाहीत त्यामुळे मूड जातो किंवा त्या जागेचा, तिथल्या हवामानाचा, लोकांचा, त्यांच्या राहणीमानाचा अंदाज नसल्याने किंवा अनुभव नसल्याने काही गोष्टी आपल्याकडून चुकतात.. राहून जातात… पण “काही होत नाही… आपण करू मॅनेज” असं म्हणून थोडी अॅडजस्ट करायची तयारी असेल, थोडी रिस्क घ्यायची तयारी असेल तर ह्यासारखा उत्तम पर्याय नाही!

बाहेर फिरायला जाताना, प्रवासाची आखणी करताना सगळ्यात पहिला विचार ट्राव्ह्ल स्टाइलचा करावा असं मला वाटतं. काय हेतू मनात ठेवून आपण बाहेर पडतो आहोत? रोजच्या दैनंदिनीचा कंटाळा आला आहे म्हणून आराम हवा आहे आणि सोबत वातावरणात बदल हवा आहे, वेगळं काहीतरी करून बघायची इच्छा आहे, प्रसिद्ध ठिकाणं, प्रसिद्ध देश पाहण्यासाठी आणि तिथला अनुभव घेण्यासाठी, एखादी जागा, देश संस्कृती ह्याबद्दल आकर्षण आहे म्हणून ते एकदा तरी बघायचं आहे, नवीन संस्कृती नवीन देश, जागा अनुभवायची आहे, की फक्त एक टिकमार्क हवा आहे ? आपण बाहेर जाण्यामागचा आपला उद्देश स्पष्ट असेल तर त्यानुसार प्रवासाची आखणी करता येते. जर रोजच्या दैनंदिनीचा कंटाळा / थकवा आल्याने फक्त आरामासाठी बाहेर पडत असू तर अश्या वेळी आपण साईटसीनसाठी फारसं बाहेर पडत नाही. जास्तीत जास्त काळ हॉटेलमध्ये निवांत बसण्यात घालवतो. अश्यावेळी रहात असणाऱ्या हॉटेलला महत्व देऊन जरा जास्त टेरिफ असलं तरीही उत्तम रिसोर्ट, मोठ्ठी पसरलेली निवांत जागा, विविध सुखसोयी, इनडोअर / आऊटडोअर गेम्स, उत्तम जेवण आणि त्यातही वेगेवगळ्या कॉनटीनेंटचे क्यूजिन, स्पा, जकुजी सारख्या इतर अनेक सुविधा असणारे हॉटेल्स निवडू शकतो आणि ह्या सगळ्यांचा आपण आस्वाद घेऊ शकतो. त्यामुळे अश्या वेळी मोठ्या आणि महागड्या हॉटेल्सवर खर्च करायला हरकत नाही. पण हेच जर आपण नवीन संस्कृती नवीन देश , जागा अनुभवायची आहे, ट्रेकिंग किंवा अॅडव्हेन्चर ट्रीप म्हणून बाहेर पडणार असू तर आपण ह्या महागड्या हॉटेल्सऐवजी होमस्टे, बुटिक हॉटेल्स (जिथे प्राथमिक गरजेच्या गोष्टी आणि उत्तम स्वछता असते असे विविध पर्याय) वगैरेंचा विचार करू शकतो. मुळात आपला बराचसा काळ हा बाहेरच्या गोष्टी बघण्यात साइटसीन मध्ये जाणार असल्याने मोठया हॉटेल्समध्ये असणाऱ्या विविध सुविधांचा आपण लाभ घेऊ शकत नाही. त्यामुळे अश्या गोष्टींसाठी पैसे खर्च करण्यापेक्षा, होमस्टे किंवा तत्सम पर्याय निवडून, वाचणाऱ्या पैशातून अजून दोन चार गोष्टी बघू शकतो, असं मला वाटतं.
माझ्यामते रोडट्रीप, ट्रेकिंग, हायकिंग, कॅम्पिंग, सायकलिंग टूअर, रुरल गेटवे (खेड्यापाड्यात/ आडजागी प्रवास), सिटी ट्राव्ह्ल, लेजर ट्राव्ह्ल, लक्झुरी ट्राव्ह्ल, बॅगपॅकर्स ट्राव्ह्ल, अनप्लान ट्राव्ह्ल / निव्वळ भ्रमंती, फक्त नातेवाइक/मित्रमंडळींकडे जाणे ह्या सगळ्या वेगवेगळ्या ट्राव्ह्ल स्टाइलस आहेत आणि प्रवासाची आखणी करताना सगळ्यात आधी ह्या गोष्टीचा निश्चित विचार करावा.

देश / जागा ठरवताना :

कोणत्याही प्रवासाची आखणी करताना ठिकाण किंवा वेळ ह्या दोन्हीपैकी एक गोष्ट पहिल्यांदा ठरवून संपूर्ण ट्रीप त्यानुसार ठरवता येते. म्हणजे जर प्रवासाच्या तारखा ठरलेल्या असतील आणि त्याच दिवसांत ट्रीपला जायचं असेल तर त्या दिवसांत आणि त्या हवामानात कोणती ठिकाणं बघता येतील हे ठरवता येतं किंवा जर ठिकाण ठरलेलं असेल तर त्या ठिकाणी जायचा उत्तम ऋतू कोणता ह्याचा शोध घेऊन त्या दरम्यान जाता येतं. जर आपलं ठिकाण ठरलेलं असेल तर तिथे जायचा योग्य किंवा पिक सिझन कोणता हे शोधून काढायचं आणि त्या सिझनच्या थोडसं आधी किंवा थोडसं नंतर जायचं. ह्यामागचा मूळ उद्देश म्हणजे त्यावेळी तापमान साधारणपणे अनुकूल असतं , गर्दी वाढलेली नसते त्यामुळे कमी वेळात जास्त गोष्टी बघून होतात आणि रांगेत उभं राहून (तिकीट काढण्यासाठीच्या/ प्रवेशासाठीच्या रांगा ) वेळ वाया जात नाही. खूप गर्दीमुळे पर्यटनस्थळांचा आणि पर्यायाने पर्यटनाचा विचका होतो असं मला वाटतं. मुख्य म्हणजे ह्या काळात हॉटेल्स, विमान तिकिटांचे दर व इतर अनेक गोष्टी कमी दरात उपलब्ध होतात. सिझन चालू झाल्यावर गेल्यास विमानाच्या तिकीटांपासून ते हॉटेल्सच्या रूम्स, ट्रान्सपोर्ट सगळंच जवळजवळ दीडपट झालेलं असतं .

देश ठरल्यानंतर :

१. तिथे जाण्याचा उत्तम सिझन कोणता ?
२. आपण ज्या दिवसांत जायचा विचार करत आहोत त्यावेळी तिथलं हवामान अंदाजे काय असणारं आहे ?
३. त्या देशात किती राज्य आहेत आणि आपण कुठे कुठे जाऊ शकतो / जायला हवं ?
४. त्या देशाचा नकाशा डाऊनलोड करायचा.
५. त्या देशाच्या टुरिझम मिनिस्ट्रीच्या ऑफिशीअल वेबसाईटवर जाऊन जमेल तेवढी माहिती गोळा करायची.
६. आपल्याकडे उपलब्ध असणाऱ्या वेळेनुसार २/३/४ शहरं टिपून ठेवायची. ही शहरं निवडताना ती एकमेकांपासून जवळ आहेत नं किंवा त्यांना जोडणारे रस्ते / वाहतूक व्यवस्था ह्याबद्दलची माहिती काढायची. त्या शहरांमधील अंतर पार करण्यासाठी बस / ट्रेन / बोट / विमानाने लागणारा अंदाजे वेळ आणि खर्च टिपून ठेवायचा.
७. प्रत्येका शहरात किती दिवस रहायचं ?
८. आधी कोणत्या शहरात राहायचं आणि कुठून कुठे जाणं सोयीचं ठरेल ? ह्यासाठी आपण नकाशाचा आणि गूगल मॅप्सचा आधार घेऊ शकतो.

आज इथेच थांबूया. उर्वरित गोष्टींसाठी पुन्हा भेटूया पुढच्या लेखात…!!!!

#घघराचा #नियोजनामागचेप्रयोजन #प्रवास #अभ्यास #रिसर्च #प्रवासाचीतयारी #नियोजन#आखणी
#ghaghracha #travel #traveldiary #itinerary #planning #tourplanning#tourism

Related Posts

आपल्या प्रतिक्रिया/ कॉमेंट आपण इथे नोंदवू शकता

Your email address will not be published.

https://teamradioshack.com/ https://lit.link/en/totoagung2slot https://linkby.tw/qdal88.slot https://heylink.me/totoagung-situs-slot-online-gacor-terbaik-terpercaya/ https://linklist.bio/daftar-slot-4d https://heylink.me/bocoran-slot-gacor-hari-ini-situs-judi-online-restoslot4d/ https://ffm.bio/daftar-restoslot4d https://linkby.tw/totoagung2slot https://new.c.mi.com/th/post/114045 https://instabio.cc/cantiktoto-link https://s.id/Slotgacor4DOfficial https://naturalhistorymag.com/artdepartment/freebet-tanpa-deposit/ https://instabio.cc/link-daftar-amintoto https://heylink.me/restoslot4d-situs-pay4d-resmi-paling-gacor-indonesia/ https://idolink.com/slotgacor4dofficial https://allmy.bio/IDN-Slot-online-amintoto https://linkby.tw/amintoto-link-alternatif https://naturalhistorymag.com/content/spaceman-pragmatic/ https://wlo.link/@restoslot4d_gacor https://mssg.me/amintoto-slot-online https://akangzeyus.com/ https://heylink.me/cantiktoto-bandar-slot-online-gacor-resmi-idnplay/ https://heylink.me/link-alternatif-slot-pay4d/ https://idolink.com/qdal88slot https://ffm.bio/cantiktoto_slot https://heylink.me/agen-slot-demo-pragmatic-terpercaya-qdal88/ https://heylink.me/totoagung2-situs-slot-online-resmi-gacor-terpercaya-menang/ https://heylink.me/qdal88-situs-slot-gacor-online-freebet-tanpa-deposit/ https://solo.to/totoagung-slot https://lit.link/en/qdal88link https://heylink.me/restoslot4d-daftar-situs-slot-gacor-online-pay4d/ https://idolink.com/slothoki https://antartidargentina.com/ https://s.id/amintoto-slot-online https://blog.motorola.de/wp-content/slot-gacor-4d/ https://lynk.id/qdal88_slot_pulsa https://lynk.id/daftar_slot_4d https://instabio.cc/totoagung2-slot https://linkr.bio/restoslot4d-login https://idolink.com/totoagung2slot https://heylink.me/link-alternatif-slot-online-gacor-cantiktoto/ https://heylink.me/situs-slotgacor-4d-gampang-menang-maxwin/ https://ffm.bio/amintoto_official https://naturalhistorymag.com/content/slot-gacor/ https://lynk.id/totoagung_link https://allmy.bio/Slotgacor4dOfficial https://heylink.me/link-slot-gacor-totoagung2-pusat-game-terlengkap/ https://s.id/daftar-restoslot4d https://lynk.id/cantiktoto https://heylink.me/link-alternatif-situs-slot-gacor-online-amintoto/ https://heylink.me/slotgacor4d-situs-slot-online-gampang-menang-resmi-pay4d/ https://motivasiagung.com/ https://allmy.bio/cantiktoto-slot https://heylink.me/totoagung-situs-slot-online-resmi-pusat-pragmatic-play/ https://replit.com/@totoagung2slot https://mssg.me/cantiktoto_slot https://ffm.bio/qdal88_slot4d https://heylink.me/link-alternatif-resmi-restoslot4d-terbaik-gampang-menang https://wlo.link/@totoagung_slot https://lit.link/en/amintotoslotonline https://news-business.co.uk/slot-gacor-4d/ https://heylink.me/totoagung-situs-slot-online-resmi/ https://heylink.me/cantiktoto-situs-slot-online-terpercaya-gacor-lisensi-resmi/ https://heylink.me/agen-slot-pay4d/ https://jemi.so/amintoto-situs-slot-online-terpercaya https://new.c.mi.com/th/post/113199 https://raizeducacao.com.br/freebet-slot/ https://linkby.tw/cantiktotolink https://allmy.bio/qdal88-slot https://lynk.id/totoagung_slot https://jemi.so/cantiktotositusjudislotonlineterpercayaslotgacorpragmaticplayterbaikdiindonesia https://brainwavelove.com/ https://bandungheritage.org/ https://lynk.id/amintotoofficial https://solo.to/amintoto_official https://replit.com/@cantiktotogacor https://replit.com/@totoagungslot https://allmy.bio/totoagung2-slot https://linklist.bio/amintoto_link_daftar https://slotgacor4d.com/ https://ffm.bio/totoagung2_slot https://heylink.me/situs-slot-gacor4d-resmi-mudah-menang/ https://heylink.me/bocoran-situs-slot-gacor-gampang-menang-cantiktoto/ https://new.c.mi.com/th/post/116758 https://linklist.bio/qdal88-slot https://linkby.tw/totoagung-slot https://www.printersupportpro.us/blog/wp-content/uploads/slot-idn/ https://www.soulrichwoman.com/slotgacor4d/ https://skillscanada.bc.ca/idn-slot/ https://replit.com/@Slotgacor4doff https://linklist.bio/totoagung2_slot https://idolink.com/cantiktotoslot https://heylink.me/situs-slot-gacor-4d-gampang-menang/ https://heylink.me/daftar-slot-online-gacor-akun-vip-qdal88/ https://linktr.ee/totoagung2 https://naturalhistorymag.com/htmlsite/slot88-gacor/ https://mssg.me/qdal88-situs-judi-slot-paling-gacor-hari-ini https://heylink.me/slot-demo-pragmatic-qdal88-gratis-tanpa-deposit/ https://s.id/cantiktoto_slot https://linkby.tw/slotgacor4d.official https://heylink.me/cantiktoto/ https://heylink.me/link-alternatif-slot-pay4d/ https://linkr.bio/qdal88-slot4d https://idolink.com/amintotodaftarslotonline https://linklist.bio/Slotgacor4DOfficial https://linklist.bio/totoagung-slot https://heylink.me/qdal88/ https://meelink.bio/slot-gacor-maxwin https://mssg.me/totoagung2_slot https://heylink.me/daftar-slot-gacor-vip-khusus-situs-totoagung2/ https://s.id/totoagung-slot https://agungsport.com/ https://jemi.so/restoslot4dgacor https://heylink.me/totoagung_situs_deposit_pulsa/ https://produkvvip.com/ http://ptos.kimia.gov.my/css/sass/slot-pulsa/ https://heylink.me/qdal88.gampang.hoki/ https://heylink.me/SlotGacor4D/ https://heylink.me/bocoran-slot-gacor-pagi-siang-malam-hari-ini-amintoto/ https://instabio.cc/daftar-slot-4d https://solo.to/totoagung2_slot https://heylink.me/slot-gacor-online-rtp-tertinggi-situs-judi-amintoto/ https://skskismizamanli.cumhuriyet.edu.tr/image/demo/slot-pulsa/ https://wlo.link/@cantiktoto_slot https://lit.link/slotgacor4dnew https://ffm.bio/slotgacor4dofficial https://replit.com/@Resto4d https://solo.to/qdal88-slot https://heylink.me/totoagung2-situs-judi-slot-online-gacor-indonesia/ https://heylink.me/amintoto-daftar-situs-slot-online-gacor-indonesia/ https://heylink.me/restoslot4d-rtp-live-slot-gacor-tertinggi-hari-ini/ https://instabio.cc/Slotgacor4DOfficial https://allmy.bio/totoagung-slot https://naturalhistorymag.com/htmlsite/bo-slot-gacor/ https://linkby.tw/daftar_restoslot4d https://idolink.com/totoagungslot https://solo.to/resto-slot-4d https://heylink.me/link-slot-online-gacor-terpercaya-totoagung/ https://heylink.me/agen-slot-gacor-terkuat-totoagung-gampang-menang/ https://replit.com/@qdal88link https://ffm.bio/totoagung-slot https://heylink.me/cantiktoto-link-slot-online-gacor-terpercaya-resmi-idnplay/ https://solo.to/slotgacor4dofficial https://mssg.me/totoagung-situs-slot-online-paling-gacor https://heylink.me/link-alternatif-slot-freebet-qdal88/ https://instabio.cc/totoagung-slot https://instabio.cc/qdal88-slot https://lit.link/en/restoslot4dterpercaya https://heylink.me/amintoto-situs-slot-online-terpercaya-gampang-menang/ https://mssg.me/slotgacor4dofficial http://bpp346.bpp.police.go.th/slot-gacor-maxwin/ https://heylink.me/agen-slot-pay4d/ https://lit.link/en/cantiktotolink https://replit.com/@AmintotoDaftar https://mssg.me/slot-hoki-restoslot4d https://lynk.id/totoagung2_slot https://lynk.id/slotgacor4dofficial https://heylink.me/situs-slot-demo-gratis-totoagung2/