Close

आठवड्याचा मेन्यू ठरवताना

  • Gha Gharacha

 

मला वेगवेगळे पदार्थ खाण्याची भयंकर आवड आहे. इतकी, की माझा मूड छान नसेल तर, मी थेट आवडीचा पदार्थ खाते आणि माझा मूड छान करून घेते. लहान असताना मी भाज्यांचं वर्गीकरण केलं होतं ग्लॅमरस आणि नॉन ग्लॅमरस भाज्या. गवार, वांगी, कारलं ह्या सगळ्या भाज्या माझ्या दृष्टीने नॉन ग्लॅमरस होत्या आणि म्हणूनच अश्या भाज्या असतील तर सोबत तोंडी लावायला काहीतरी छान हवं, असं मी आईला सांगून ठेवलेलं होतं. माझे हे सगळे नखरे सहन करायचे म्हणजे तिची तारांबळ उडायची. पण तिने जे आठवडयाचं मेन्यू प्लानिंग केलं होतं ते अत्यंत खोलवर आणि अभ्यासपूर्ण होतं. तेव्हा आठवडयाचं मेन्यू प्लानिंग करताना ती जो विचार करायची तो आपल्यासमोर मांडणार आहे. माझ्या लग्नानंतर आईने शिकवलेले हे आठवड्याचे मेन्यू प्लानिंग मला फार उपयोगी पडले, कदाचित तुम्हालाही त्याचा उपयोग होईल.

 

  • लहानपणी परीक्षा जवळ आली की आपण अतिशय उत्साहात येऊन एक टाइमटेबल तयार करायचो. आपण अतिशय उत्साहात येऊन केल्यामुळे ते एकतर खूप अघोरी असायचं किंवा त्यानुसार अभ्यास करायचा आपल्याला कंटाळा यायचा आणि ते टाइमटेबल कायम कोलमडून पडायचं. त्यामुळे जेवढं शक्य असेल तेवढं साधं सोपं आणि पटकन करता येईल अश्या पद्धतीने हे मेन्यू प्लानिंग करावं असं मला वाटतं.

 

  • सुरुवातीला थोड्या दिवसांकरिता मेन्यू प्लानिंग करावं कारण खूप जास्त कालावधीसाठी केलं तर ते गडबडण्याचा संभव असतो.

 

  • आपल्याला होणारे स्वयंपाक आणि स्वयंपाकेतर कष्ट हे समान प्रमाणात विभागले जातील अश्या पद्धतीने मेन्यू प्लानिंग करावे. एखाद्या दिवशी खूप तयारी असणाऱ्या अवघड किंवा किचकट भाज्या मग कोशिंबीर, चटणी, आमटी असं सगळं आणि दुसऱ्या दिवशी एकेरी जेवण किंवा खूपच सोपं काहीतरी असं न करता आठवडाभर घ्यावे लागणारे कष्ट सम प्रमाणात विभागले जातील ह्याचा विचार करावा.

 

  • आपलं त्या दिवसाचं शेड्युल कसं असणार आहे किंवा कुठले क्लास कधी आहेत आपण किती वेळ घरात थांबू शकणार आहोत, आपल्या घरी परत येण्याच्या वेळा काय आहेत, आठवड्यात कुठल्या दिवशी जास्त दगदग असणार आहे, ह्याचा विचार करून आठवड्याचे मेन्यू प्लांनिंग करावं. उदा. सोमवार आणि बुधवार क्लास असतो किंवा शुक्रवारी घरी यायला उशीर होतो. मग अश्या वेळी कमी वेळ हातात असल्याने पटकन होणारे, लवकर शिजणारे पदार्थ करावेत.

 

  • घरामध्ये एखाद्या व्यक्तीला जर पथ्यपाणी असेल अथवा कुणाचा डाएट प्लान असेल तर अश्या गोष्टीसुद्धा विचारात घ्याव्यात.

 

  • घरात उपलब्ध असणाऱ्या गोष्टी किंवा बाजारात सहजासहजी उपलब्ध होऊ शकतील अश्या गोष्टींचा विचार करून मेन्यू प्लानिंग करावे.

 

  • मेन्यू प्लानिंग झालं, की त्याचा चक्क एक फोटो आपल्या मोबाईल मध्ये काढून ठेवावा म्हणजे घरातून बाहेर पडताना किंवा ऑफिस वरून येताना दरवेळी आपलं मेन्यू प्लानर सोबत ठेवण्याची गरज नाही. मेन्यू तयार असेल तर त्यानुसार आठवड्याची भाजी आणणे सोपे जाते.
    ह्याउलट, तुम्ही आधी भाज्या खरेदी केल्या असतील आणि नंतर मेन्यू प्लानिंग करणार असाल तर खरेदीच्या सर्व पिशव्या ओट्यावर ओतायच्या, त्याचा फोटो काढायचा, सर्व गोष्टी जागच्या जागी ठेवायच्या, उत्तम कॉफी करायची आणि मग मेन्यू प्लानिंग करायचं.

 

  • हल्ली ‘गूगल प्ले’वर मेन्यू प्लानिंगचे मोफत अँप असतात. आपण त्याचादेखील वापर करू शकता. मला स्वतःला हातानी आठवड्याचा मेन्यू लिहिलेला आवडतो. त्यामुळे मी ह्या अँपच्या भानगडीत पडत नाही. पण तुम्हाला जर इच्छा असेल तर तुम्ही नक्की प्रयत्न करून बघू शकता.

 

  • माझ्या आईने एक मास्टर लिस्ट बनवली आहे. आम्ही त्याला ‘घरचं मेन्यूकार्ड’ म्हणतो. घरातल्या लोकांच्या आवडीनिवडीनुसार तुम्हीदेखील अशी मास्टर लिस्ट बनवू शकता. हे सगळं करत असताना थोडा वेळ काढावा लागतो पण अर्थातच तो एकदाच द्यावा लागतो. One time investment. त्यामुळे एवढे कष्ट एका वेळेला घेणे न्याय्य आहे असं मला वाटतं. मेन्यू प्लांनिंग करताना ह्या मास्टर लिस्टचा खूप फायदा होतो. दरवेळी विचार करत बसावं लागत नाही. नुसती ही मास्टर लिस्ट चाळली तरी पटकन मेन्यू प्लांनिंग करता येईल.

 

  • स्वयंपाक ही एक कला आहे. नविन नविन पदार्थ केल्याने ही कला वृद्धिंगत तर होतेच पण त्यातून आपल्याला मिळणारा आनंद निराळाच असतो आणि वेगळा पदार्थ खायला मिळाल्यामुळे घरच्यांनाही आनंद होतो. आहारातलं नाविण्य मन प्रसन्न करतं. त्या निमित्ताने आपल्याला नानाविध गोष्टी कळतात, शिकायला मिळतात आणि काम करायला पण उत्साह येतो. बरेच जण स्ट्रेसबस्टर म्हणूनही स्वयंपाकाचा वापर करतात. महिना दोन महिन्यातून एकदा एखादी नवीन रेसिपी करावी असं मला वाटतं आणि अशी नवीन रेसिपी आवडली तर ती आपल्या मास्टर लिस्ट मध्ये लगेच नोंदवून ठेवावी.

 

 

  • जर आपण नेट वर शोधून मग पाककृती करत असू तर आपले आवडते ब्लॉग्स/ चॅनेल्स फेवरेट लिस्टमध्ये टाकून ठेवा (किंवा त्यांची नोंद करून ठेवा), त्यांना सबसक्राइब करून ठेवा म्हणजे त्यांनी नवीन काही अपलोड केले की आपल्याला लगेच कळेल आणि आपल्याला काही हवं असेल तेव्हा फार शोधत बसायला लागत नाही. मी माझ्या युट्यूब अकाउंटवर ‘नवीन पाककृती’ अश्या नावाने एक प्लेलिस्ट बनवली आहे. मला काही नवीन दिसलं की मी त्यात टाकून ठेवते आणि मग आठवड्याचा मेन्यू ठरवताना त्यातून एखादी गोष्ट निवडते.

 

 

  • जे पदार्थ बनविताना जास्त वेळ लागणार आहे असे पदार्थ मी शुक्रवारी रात्री बनवते आणि जे पदार्थ बनवताना जास्त तयारी लागणार आहे असे पदार्थ मी रविवारी किंवा सोमवारी बनवते (माझं सोमवार ते शुक्रवार ऑफिस असतं आणि शनिवार रविवार सुट्टी असते). सोमवारी असा काही पदार्थ बनवायचा असेल तर शनिवार, रविवार मध्ये तयारी करता येते आणि तो पदार्थ सोमवारी पटकन करू शकतो असं मला वाटतं.

 

  • शुक्रवार हा माझा ‘उरला सुरला’ वार असतो. आपण पाव किलो भाजी आणतो त्यातली थोडी भाजी करतो आणि थोडी भाजी उरते. परंतू त्या उरलेल्या भाजीतून पुन्हा दुसऱ्या वेळची भाजी होऊ शकत नाही. आठवडाभरात अश्या दोन भाज्या तरी राहिलेल्या असतात मग अश्यावेळी उरलेल्या सर्व भाज्या एकत्र करून पराठे, पुलाव, असं काहीतरी बनवते म्हणजे सगळ्या भाज्या संपून जातात.

 

  • जर दुपारच्या जेवणाचे फक्त डबेच असतील आणि घरी जेवणारे कोणी नसेल तर दुपारच्या जेवणात फक्त कोरड्या भाज्या करायच्या आणि पातळ भाज्या रात्री करायच्या म्हणजे रात्रीच्या वेळी वरण/आमटी न करता एकच पातळ भाजी केली तरी चालते आणि डब्यातून पातळ भाजी न्यायचा आणि ती सांडायचा प्रश्न येत नाही.

 

  • आठवड्याचा मेन्यू ठरवताना : –
    – आठवड्यातून किमान एकदातरी पालेभाजी करावी. जर भाजी नाही केली तर पालेभाजी वापरून पराठे, भात, सॅलेड किंवा इतर        कोणत्याही पद्धतीने ती भाजी पोटात जाईल याची सोय करावी;
    – दिवसातून एकतरी फळ खावे. (४ वाजता भूक लागल्यावर किंवा रात्रीच्या जेवणानंतर मला फळं खायला आवडते.);
    – आठवड्यातून किमान एकदातरी कडधान्याची उसळ/ सॅलेड /कोशिंबीर करावी;
    – ब्रेडचे पदार्थ आठवड्यातून दोन पेक्षा जास्त वेळा करायचे टाळावे;
    – समतोल आणि चौरस आहार पोटात जाईल याचा जरूर विचार करावा.

 

  • आठवड्याचा मेन्यू ठरवताना हवामानाचा आणि ऋतूबदलाचाही विचार करावा असं मला वाटतं.

 

  • आपल्याकडे प्रत्येका सणाला त्याची एक कहाणी आहे आणि त्याला अनुसरून  त्यादिवशी कुठले पदार्थ करावेत ह्याचे संकेत आहेत. त्यामुळे त्या आठवड्यात येणारे सणवार / उपवास यांचा देखील विचार आठवड्याचा मेन्यू ठरवताना करावा.

 

  • त्या आठवड्यात जर घरी कुणी पाहुणे येणार असतील, कुणाला घरी जेवणाचे आमंत्रण दिलेले असेल तर त्यांचे पथ्य पाणी, आवडीनिवडी ह्या सगळ्याचा मेन्यू ठरवताना विचार करावा. घरी पाहुणे आले असतील तर त्यांचे यथायोग्य  आदरातिथ्य केल्याने आणि ते परतल्यानंतर घरातली आवरआवरी केल्याने आपल्याला दमायला होते. तेव्हा पाहुणे गेल्या नंतरच्या दिवशी खूप साधे सोपे आणि कमी कष्टाचे पदार्थ ठरवावेत जेणेकरून आपली कमी प्रमाणत दगदग होईल आणि थोडा आराम मिळू शकेल.

 

  • बऱ्याचदा स्वतःला न आवडणारी भाजी बायका आणतच नाहीत आणि त्यामुळे ती भाजी घरात इतरांनादेखील खायला मिळत नाही. आपल्याला न आवडणारी भाजी ठरवून महिन्यातून एकदातरी करवी. त्यावेळी बाकीचा मेन्यू अगदीच आवडीचा करावा म्हणजे नावडीची भाजी नाक न मुरडता पोटात जाते.

 

 

  • भाज्यांची साठवणूक हा मेन्यू प्लानिंगचा एक महत्वाचा भाग असतो पण त्यावर आपण सविस्तर बोलणार आहोत.

 

 

  • जेवताना भाजी नावडीची असली की लोणचं आणि चटण्यांचाच आधार असतो. जवस कारळाची चटणी शरीरालादेखील उपयुक्त असते. त्यामुळे चटण्या किंवा लोणचे यांचे आहारातील महत्व फार मोठे आहे. आपल्या आहारामध्ये आलटून पालटून वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या, लोणचं यांचा समावेश होईल याचा विचार करावा. दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी मी सर्व प्रकारच्या चटण्या/लोणचं किंवा तोंडीलावण हे करून ठेवते.

 

  • जर अजून नाविण्यपूर्ण किंवा कलात्मक करायचं असेल तर थीम डे ठेवायचा म्हणजे दाक्षिणात्य पदार्थ/ फ्रेंच पदार्थ/ चायनीज पदार्थ अश्या थीम घेऊन त्या दिवशी सगळ्या त्या प्रांतातल्या पाककृती बनवायच्या.

 

  • एखाद्या आठवड्यात शनिवार/रविवारी काही वेळखाऊ कामं येतात किंवा आपल्याला गावाला जायचे असते. तेव्हा आपण आठवड्याचे मेन्यू प्लान करण्यासाठी खूप वेळ देऊ शकत नाही. अश्या वेळी मागच्या काही आठवड्यांपूर्वीचं मेन्यू प्लानिंग आपण वापरू शकतो.

 

  • मेन्यू प्लांनिंग करताना मला एक सवय आहे. दुसऱ्या दिवशीच्या मेन्यूसाठी काही पूर्वतयारी लागणार असेल किंवा बाजारातून काही आणायचे असेल तर ते मी त्या दिवसाच्या मेन्यूवर कोपऱ्यात लिहून ठेवते. ह्याचा उपयोग आपण मागच्या एखाद्या आठवड्याचे मेन्यू प्लानिंग परत वापरतो तेव्हा होतो.

 

  • आमच्याकडे सहसा फारसं अन्न उरत नाही. परंतू दरवेळी शिजलेलं सगळं अन्न संपेलच असं नसतं. काही जणांकडे बऱ्याचदा थोडसं तरी अन्न उरलेलं असतं किंवा ‘घर म्हणून जरा जास्तीच असावं’ म्हणून अंमळ जास्तच केलेलं असतं. अश्या वेळी आठवड्याचा मेन्यू ठरवणं अवघड जातं. जर असं असेल तर, आठवड्याचा मेनू ठरवताना मधला एक दिवस रिकामा ठेवायचा म्हणजे पूर्ण नियोजन गडबडत नाही आणि म्हणूनच बुधवारला ‘Leftover Day’ असं म्हणतात. आठवड्यातला मधला वार म्हणून जर बुधवार रिकामा ठेवला आणि आधीचं अन्न उरत आलेलं असेल तर ते बुधवारी संपवू शकतो आणि पुन्हा पुढचा स्वयंपाक ठरवल्याप्रमाणे करता येऊ शकतो.

 

ह्या मेनू प्लानिंगचा सगळ्यात मुख्य फायदा म्हणजे आयत्या वेळी गडबड गोंधळ होत नाही कारण आपण बहुतांश तयारी आधीच करून ठेवतो. अगदी खरं सांगायचं म्हणजे कुठल्याही प्रकारचं नियोजन करताना ते चहुबाजूने आणि खोलवर विचार करून केलं तर सहसा ते गडबडत नाही. परंतू, आपण नियोजन केलं तरी कोणत्याही गोष्टीचा अट्टहास किंवा हट्ट धरू नये. दरवेळी नियोजनाप्रमाणे सगळ्या गोष्टी घडतातच असं नाही. नियोजन हे आपलं काम सोपं व्हावं म्हणून असतं. नियोजनामुळे जर आपल्यावर भार येत असेल तर ते मात्र चुकीचं आहे. जेवढं शक्य असेल तेवढं आमलात अणावं आणि जर एखादी गोष्ट नाही करू शकलो तरी हरकत नसावी.

 

ह्या सदरामध्ये, मेन्यू ठरविताना काय काय विचार करावा ह्यावर आपण चर्चा केली. पुढच्या सदरात आपण बघणार आहोत आठवड्याचे तयार मेन्यू. तेव्हा लवकरच भेटू पुढच्या सदरात..!!!

 

Related Posts

2 thoughts on “आठवड्याचा मेन्यू ठरवताना

  1. स्वप्नील चव्हाण

    मी पण करते आठवड्याचे मेन्यु प्लानिंग आणी पूर्वतयारी हि, खूप फायदा होतो, वेळ आणि श्रम पण वाचतात,तुम्ही अगदी सोप्या शब्दात लिहिले आहे हे, छान आवडलं मला.

आपल्या प्रतिक्रिया/ कॉमेंट आपण इथे नोंदवू शकता

Your email address will not be published.

https://teamradioshack.com/ https://lit.link/en/totoagung2slot https://linkby.tw/qdal88.slot https://heylink.me/totoagung-situs-slot-online-gacor-terbaik-terpercaya/ https://linklist.bio/daftar-slot-4d https://heylink.me/bocoran-slot-gacor-hari-ini-situs-judi-online-restoslot4d/ https://ffm.bio/daftar-restoslot4d https://linkby.tw/totoagung2slot https://new.c.mi.com/th/post/114045 https://instabio.cc/cantiktoto-link https://s.id/Slotgacor4DOfficial https://naturalhistorymag.com/artdepartment/freebet-tanpa-deposit/ https://instabio.cc/link-daftar-amintoto https://heylink.me/restoslot4d-situs-pay4d-resmi-paling-gacor-indonesia/ https://idolink.com/slotgacor4dofficial https://allmy.bio/IDN-Slot-online-amintoto https://linkby.tw/amintoto-link-alternatif https://naturalhistorymag.com/content/spaceman-pragmatic/ https://wlo.link/@restoslot4d_gacor https://mssg.me/amintoto-slot-online https://akangzeyus.com/ https://heylink.me/cantiktoto-bandar-slot-online-gacor-resmi-idnplay/ https://heylink.me/link-alternatif-slot-pay4d/ https://idolink.com/qdal88slot https://ffm.bio/cantiktoto_slot https://heylink.me/agen-slot-demo-pragmatic-terpercaya-qdal88/ https://heylink.me/totoagung2-situs-slot-online-resmi-gacor-terpercaya-menang/ https://heylink.me/qdal88-situs-slot-gacor-online-freebet-tanpa-deposit/ https://solo.to/totoagung-slot https://lit.link/en/qdal88link https://heylink.me/restoslot4d-daftar-situs-slot-gacor-online-pay4d/ https://idolink.com/slothoki https://antartidargentina.com/ https://s.id/amintoto-slot-online https://blog.motorola.de/wp-content/slot-gacor-4d/ https://lynk.id/qdal88_slot_pulsa https://lynk.id/daftar_slot_4d https://instabio.cc/totoagung2-slot https://linkr.bio/restoslot4d-login https://idolink.com/totoagung2slot https://heylink.me/link-alternatif-slot-online-gacor-cantiktoto/ https://heylink.me/situs-slotgacor-4d-gampang-menang-maxwin/ https://ffm.bio/amintoto_official https://naturalhistorymag.com/content/slot-gacor/ https://lynk.id/totoagung_link https://allmy.bio/Slotgacor4dOfficial https://heylink.me/link-slot-gacor-totoagung2-pusat-game-terlengkap/ https://s.id/daftar-restoslot4d https://lynk.id/cantiktoto https://heylink.me/link-alternatif-situs-slot-gacor-online-amintoto/ https://heylink.me/slotgacor4d-situs-slot-online-gampang-menang-resmi-pay4d/ https://motivasiagung.com/ https://allmy.bio/cantiktoto-slot https://heylink.me/totoagung-situs-slot-online-resmi-pusat-pragmatic-play/ https://replit.com/@totoagung2slot https://mssg.me/cantiktoto_slot https://ffm.bio/qdal88_slot4d https://heylink.me/link-alternatif-resmi-restoslot4d-terbaik-gampang-menang https://wlo.link/@totoagung_slot https://lit.link/en/amintotoslotonline https://news-business.co.uk/slot-gacor-4d/ https://heylink.me/totoagung-situs-slot-online-resmi/ https://heylink.me/cantiktoto-situs-slot-online-terpercaya-gacor-lisensi-resmi/ https://heylink.me/agen-slot-pay4d/ https://jemi.so/amintoto-situs-slot-online-terpercaya https://new.c.mi.com/th/post/113199 https://raizeducacao.com.br/freebet-slot/ https://linkby.tw/cantiktotolink https://allmy.bio/qdal88-slot https://lynk.id/totoagung_slot https://jemi.so/cantiktotositusjudislotonlineterpercayaslotgacorpragmaticplayterbaikdiindonesia https://brainwavelove.com/ https://bandungheritage.org/ https://lynk.id/amintotoofficial https://solo.to/amintoto_official https://replit.com/@cantiktotogacor https://replit.com/@totoagungslot https://allmy.bio/totoagung2-slot https://linklist.bio/amintoto_link_daftar https://slotgacor4d.com/ https://ffm.bio/totoagung2_slot https://heylink.me/situs-slot-gacor4d-resmi-mudah-menang/ https://heylink.me/bocoran-situs-slot-gacor-gampang-menang-cantiktoto/ https://new.c.mi.com/th/post/116758 https://linklist.bio/qdal88-slot https://linkby.tw/totoagung-slot https://www.printersupportpro.us/blog/wp-content/uploads/slot-idn/ https://www.soulrichwoman.com/slotgacor4d/ https://skillscanada.bc.ca/idn-slot/ https://replit.com/@Slotgacor4doff https://linklist.bio/totoagung2_slot https://idolink.com/cantiktotoslot https://heylink.me/situs-slot-gacor-4d-gampang-menang/ https://heylink.me/daftar-slot-online-gacor-akun-vip-qdal88/ https://linktr.ee/totoagung2 https://naturalhistorymag.com/htmlsite/slot88-gacor/ https://mssg.me/qdal88-situs-judi-slot-paling-gacor-hari-ini https://heylink.me/slot-demo-pragmatic-qdal88-gratis-tanpa-deposit/ https://s.id/cantiktoto_slot https://linkby.tw/slotgacor4d.official https://heylink.me/cantiktoto/ https://heylink.me/link-alternatif-slot-pay4d/ https://linkr.bio/qdal88-slot4d https://idolink.com/amintotodaftarslotonline https://linklist.bio/Slotgacor4DOfficial https://linklist.bio/totoagung-slot https://heylink.me/qdal88/ https://meelink.bio/slot-gacor-maxwin https://mssg.me/totoagung2_slot https://heylink.me/daftar-slot-gacor-vip-khusus-situs-totoagung2/ https://s.id/totoagung-slot https://agungsport.com/ https://jemi.so/restoslot4dgacor https://heylink.me/totoagung_situs_deposit_pulsa/ https://produkvvip.com/ http://ptos.kimia.gov.my/css/sass/slot-pulsa/ https://heylink.me/qdal88.gampang.hoki/ https://heylink.me/SlotGacor4D/ https://heylink.me/bocoran-slot-gacor-pagi-siang-malam-hari-ini-amintoto/ https://instabio.cc/daftar-slot-4d https://solo.to/totoagung2_slot https://heylink.me/slot-gacor-online-rtp-tertinggi-situs-judi-amintoto/ https://skskismizamanli.cumhuriyet.edu.tr/image/demo/slot-pulsa/ https://wlo.link/@cantiktoto_slot https://lit.link/slotgacor4dnew https://ffm.bio/slotgacor4dofficial https://replit.com/@Resto4d https://solo.to/qdal88-slot https://heylink.me/totoagung2-situs-judi-slot-online-gacor-indonesia/ https://heylink.me/amintoto-daftar-situs-slot-online-gacor-indonesia/ https://heylink.me/restoslot4d-rtp-live-slot-gacor-tertinggi-hari-ini/ https://instabio.cc/Slotgacor4DOfficial https://allmy.bio/totoagung-slot https://naturalhistorymag.com/htmlsite/bo-slot-gacor/ https://linkby.tw/daftar_restoslot4d https://idolink.com/totoagungslot https://solo.to/resto-slot-4d https://heylink.me/link-slot-online-gacor-terpercaya-totoagung/ https://heylink.me/agen-slot-gacor-terkuat-totoagung-gampang-menang/ https://replit.com/@qdal88link https://ffm.bio/totoagung-slot https://heylink.me/cantiktoto-link-slot-online-gacor-terpercaya-resmi-idnplay/ https://solo.to/slotgacor4dofficial https://mssg.me/totoagung-situs-slot-online-paling-gacor https://heylink.me/link-alternatif-slot-freebet-qdal88/ https://instabio.cc/totoagung-slot https://instabio.cc/qdal88-slot https://lit.link/en/restoslot4dterpercaya https://heylink.me/amintoto-situs-slot-online-terpercaya-gampang-menang/ https://mssg.me/slotgacor4dofficial http://bpp346.bpp.police.go.th/slot-gacor-maxwin/ https://heylink.me/agen-slot-pay4d/ https://lit.link/en/cantiktotolink https://replit.com/@AmintotoDaftar https://mssg.me/slot-hoki-restoslot4d https://lynk.id/totoagung2_slot https://lynk.id/slotgacor4dofficial https://heylink.me/situs-slot-demo-gratis-totoagung2/