डिश वॉशर खरेदी : भाग दुसरा
मागच्या भागात आपण डिश वॉशरच्या खरेदीबद्दल बोलत होतो. डिश वॉशर विकत घेताना आपण जेव्हा तुलना करतअसतो तेव्हा साधारणपणे खालील गोष्टी लक्षात घ्याव्यात :
१. कंपनी / मॉडेल
२. आकार (लांबी *रुंदी * खोली )
३. क्षमता / प्लेस सेटिंग
४. प्रकार – फ्री स्टँडिंग / सेमी इंटिग्रेटेड / इंटिग्रेटेड ( )
५. एनर्जी स्टार रेटिंग
६. आवाज
७. पाणी आणि साबणासाठी इंडीकेटर
८. वॉरंटी
९. आफ्टर सेल्स सर्व्हिस
१०. बास्केट मटेरीअल
११. किती ट्रे आहेत – २ / ३
१२. एका वॉशिंग सायकलला किती पाणी लागतं
१३. प्रोग्राम्स / अप्प्लीकेश्न्स
१४. महत्वाचे फीचर्स –
– डीले स्टार्ट
– अडजस्टेबल रॅक
– चाइल्ड सेफ लॉक
– लार्ज स्प्रे हेड
– अँटी फ्लड प्रोटेक्शन
– सेन्सॉर वॉश (म्हणजे भांडी किती खराब आहेत ह्याचा अंदाज घेऊन त्यानुसार तापमान आणि वॉशिंग सायकल आपोआप ठरवलं जातं. )
– वॉटर सॉफ्टनर
महतावाच्या टिप्स
- डिश वॉशर घरी आल्यानंतर कंपनीचा माणूस डेमो द्यायला घरी येतो. परंतु, जर आपण पाण्याच्या नळाचे कनेक्शन आणि इलेक्ट्रिक कनेक्शन आधीच घेऊन ठेवले नसेल तर कंपनीचा माणूस डेमो द्यायला येऊनही काही उपयोग होत नाही. त्यामुळे आधीच दुकानात चौकशी करून कोणते कनेक्शन्स किती फुटावर लागतील, एकमेकांपासून/ मशीनपासून किती अंतरावर लागतील ह्या सगळ्याची माहिती मिळाली तर आपण त्यानुसार पूर्वतयारी करून ठेऊ शकतो.
- ज्या कंपनीचा डिश वॉशर घेणार आहात त्यांना, ह्यासोबत सॅम्पल सोपचं कीट येतं का हे विचारून घ्या. डिश वॉशरसाठी १. डिश वॉशर सॉल्ट, २. डिश वॉशर सोप / क्यूब ; आणि ३. डिश वॉशर रीन्झएड अश्या तीनही गोष्टी एकावेळी लागतात. कधीकधी कंपनी ह्यातील दोनच वस्तू देते. अश्यावेळी आपली पंचाईत होते (कारण ह्या वस्तू सगळ्या सुपरमार्केटमध्ये सहज उपलब्ध नसतात). त्यामुळे एकतर आधी सेल्समनला विचारून घ्या किंवा ऑन लाईन ऑर्डर करून ठेवल्या तरी चालतील म्हणजे त्यामुळे काम अडणार नाही. शक्यतो ह्या तीनही वस्तू एकाच कंपनीच्या असतील तर रिझल्ट चांगले मिळतात असं म्हणतात.
- साधारणपणे एकावेळी दीड ते दोन किलो डिश वॉशर सॉल्ट लागते आणि ते जवळजवळ ८-१० महिने तरी जातं. एक फुलपात्र भरून डिश वॉशर रीन्झएड टाकलं तर १० -१२ वॉशिंग सायकल होईपर्यंत पुरतं.
- वेगवेगळ्या प्रकारची भांडी घासण्यासाठी वेगवेगळे प्रोग्राम/सायकल असतात. कधी कधी खूप खराब झालेली भांडी ऑटो मोडमध्ये निघत नाहीत अश्या वेळी इंटेन्स मोड मध्ये घासली तर व्यवस्थित निघतात. हे सगळे प्रकार आपले आपण ट्रायल आणि एरर करून लक्षात येतात.
- आम्ही आत्तापर्यंत स्टीलची भांडी , काचेची भांडी , मेल्यामाईनच्या डिश, टपरवेअरचे डबे, लोखंडी तवा, प्लास्टिकचे हॅन्डल असलेले चहाचे भांडे अश्या सगळ्या गोष्टी टाकलेल्या आहेत आणि त्या स्वच्छ निघाल्या आहेत.
- वेगवेगळ्या प्रकारची भांडी घासण्यासाठी वेगवेगळे प्रोग्राम/सायकल असतात. कधी कधी खूप खराब झालेली भांडी ऑटो मोडमध्ये निघत नाहीत अश्या वेळी इंटेन्स मोड मध्ये घासली तर व्यवस्थित निघतात. हे सगळे प्रकार आपले आपण ट्रायल आणि एरर करून लक्षात येतात.
- आम्ही आत्तापर्यंत स्टीलची भांडी , काचेची भांडी , मेल्यामाईनच्या डिश, टपरवेअरचे डबे, लोखंडी तवा, प्लास्टिकचे हॅन्डल असलेले चहाचे भांडे अश्या सगळ्या गोष्टी टाकलेल्या आहेत आणि त्या स्वच्छ निघाल्या आहेत.
- जर भांडी व्यवस्थित घासली जात नसतील तर पाण्याचा दाब किंवा पाणी कमी पडत आहे असं असू शकतं. हे शोधून काढण्यासाठी डिश वॉशरच्या खालच्या भागात २-३ जग पाणी ओता आणि डिश वॉशर चालू करा. जर व्यवस्थित भांडी घासली गेली तर याचा अर्थ पाण्याच्या इनलेट किंवा वोल्व्हचा प्रोब्लेम आहे असं म्हणायला हरकत नाही. कधी कधी पात्यातून पाणी व्यवस्थित पोचत नाही कारण त्यात घाण अडकून राहिलेली असते त्यामुळे तेही अधून मधून स्वच्छ करावे लागतात.
- मशीन विकत घेताना किती डेसिबल आवाज येतो हे आपण बघितलेले असतेच पण नेहमीपेक्षा वेगळा किंवा जास्त आवाज आला तर एखादं भांड वरखाली झालेलं असू शकतं. शक्यतो मशीनमध्ये भांडे लावून झाले की एकदा पातं पूर्ण फिरवून बघायचं. जर ते पूर्ण फिरलं गेलं नाही तर भांडी नीट बसली नाहीत असा त्याचा अर्थ असतो.
- दर दीड ते दोन महिन्याने डिश वॉशर क्लिनिंग साठी डीस्केलर टाका. त्यामुळे डिश वॉशरच्या आतल्या भागांची स्वच्छता होते. अन्नाचे कण साठून राहून ते खराब होतात आणि त्यामुळे एखाद्या पार्टमध्ये घाण अडकून राहू शकते किंवा खराब होऊ शकतं पण ह्या क्लिनिंग प्रोसेसमुळे मशीन आतल्या बाजूने स्वच्छ होते. हीच पावडर फ्रंट लोडिंग वॉशिंग मशीनच्या स्वच्छतेसाठीसुद्धा वापरता येते. बऱ्याचदा मशिनच्या दाराला असणारे रबर काळे पडते किंवा त्यावर काळे डाग पडतात. ह्या सगळ्या स्वच्छतेसाठी ह्या डीस्केलरचा वापर होतो.
- डिश वॉशरसाठी जास्त पाणी लागतं हे गणित मला जरा चुकीचं वाटतं. साधारण एका सायकलला दहा लिटर पाणी लागतं आणि तेवढीच भांडी हाताने घासायला नक्कीच जास्त पाणी लागणार. अर्थात पाण्याला फोर्स असावा लागतो म्हणजे जसं वॉशिंग मशीनला लागतो तसच.
तुम्हाला हा डिश वॉशरचा लेख कसा वाटला ते जरूर कळवा..!! पुन्हा भेटू लवकरच !