Close

फ्रीज खरेदी : भाग तिसरा

  • Gha Gharacha

फ्रीजच्या खरेदीमध्ये फ्रीजचा आकार आणि प्रकार अश्या महत्वाच्या दोन गोष्टींबद्दल आपण मागील भागांत चर्चा केली. ह्या दोन मुख्य बाबींसोबत आपण इतरही काही गोष्टींचा, फ्रीज घेताना विचार करावा असं मला वाटतं.

फ्रीजची स्वच्छता :

फ्रीजच्या खरेदीमध्ये फ्रीजच्या स्वच्छतेबाबतसुध्दा विचार व्हावा असं मला वाटतं. फ्रीजचे बाह्यांग ठरवताना म्हणजे रंग असो वा मटेरियल, फ्रिजच्या स्वच्छतेसाठी आपल्याकडे असणारा वेळ हा नेहमी लक्षात घ्यायला हवा. बाहेरून स्टील बॉडी असणारा फ्रीज घेतला तर त्यावर आपल्या हाताचे ठसेसुद्धा उठून दिसतात. स्वयंपाकाच्या गडबडीत कधी खरकट्या हाताने फ्रीज उघडला जातो किंवा घरातील इतर माणसं किंवा आपल्याकडे असणारे मदतनीस दरवेळी एवढी काळजी घेतीलच असे नाही. अगदी स्टील बॉडीचा न घेता फिक्या रंगाचा घेतला जरी घेतला तरी तो स्वच्छ करायला तितकाच त्रासदायक होऊ शकतो. बऱ्याचदा असं दिसून येतं की, स्वयंपाकघराच्या फर्निचरला साजेसा म्हणून फिक्या रंगाचा फ्रीज निवडला जातो, पण नंतर त्याची स्वच्छता त्रासदायक ठरू शकते. हल्ली faux stainless surface असणारे फ्रीज पण मिळतात. हे मटेरीअल स्टीलसारखेच असते फक्त ह्यावर हाताच्या बोटांचे ठसे फारसे स्पष्ट किंवा उठून दिसत नाहीत.

फ्रीजचे रंग :

हल्ली बऱ्याच ठिकाणी ओपन किचन असतात. त्यामुळे फ्रीजचा रंग ठरवताना स्वयंपाकघर आणि बैठकीची खोली ह्या दोन्ही खोल्यांच्या रंगसंगतीचा विचार करावा लागतो. स्वयंपाकघराची रंगसंगती ठरवताना फ्रीजच्या रंगाचाही विचार केला जातो. वर म्हणल्याप्रमाणे फ्रीजचे रंग निवडताना जसा आपण रंगसंगतीचा विचार करतो तसाच त्याच्या स्वच्छतेबाबतही विचार करावा लागतो.

बाहेरून स्टील बॉडी असणारा फ्रीज घेतला तर तो दिसायला अत्यंत क्लासी दिसतो. पण त्यावर आपल्या हाताचे ठसेसुद्धा उठून दिसतात. त्यामुळे त्याची विशेष काळजी घ्यावी लागते. इतर फ्रीजपेक्षा बाहेरून स्टील फिनिश असणाऱ्या फ्रीजची किंमत जास्त असते आणि ह्या प्रकारतील फ्रीज हे शक्यतो हायएंड मॉडेल्समध्ये असतात. त्यामुळे एकंदरच हे प्रकरण जरा खर्चिक असते.

पांढऱ्या रंगाचे फ्रीज हा स्टील बॉडीपेक्षा स्वच्छतेच्या दृष्टीने सोपा आहे. पांढऱ्या रंगाचं फ्रीज बेसिक मॉडेल्सपासून ते हायएंड मॉडेल्सपर्यंत सगळ्याच रेंजमध्ये उपलब्ध असतो. त्यामुळे पांढऱ्या रंगाच्या फ्रीजमध्ये खूप प्रकार उपलब्ध असतात.

स्वच्छतेच्या भीतीपोटी गडद रंगाच्या फ्रीजची लोकप्रियता वाढत चालली आहे. साधारण ९० च्या दशकापर्यंत फ्रीजमध्ये खूप रंग उपलब्ध नव्हते आणि जे होते त्यात गडद रंगांचे प्रमाण जास्त होते. आता रेट्रो थीमने घरची अंतर्गत रचना करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे अश्या थीमला साजेसा गडद रंगांचा फ्रीजदेखील जास्त लोकप्रियता मिळवत आहे. मला असं वाटतं की, फक्त सध्याचा ट्रेंड लक्षात ठेऊन फ्रीजचा रंग ठरवू नये कारण फ्रीज आपण साधारण १० एक वर्ष तरी वापरतो आणि दहा वर्षात खूप बदल घडत असतात. त्यामुळे शक्यतो सगळ्या ट्रेंड्स मध्ये योग्य दिसेल आणि घराच्या रंगसंगतीला मिळता जुळता होईल असा रंग निवडावा.

फ्रीज दुरुस्ती :

कोणतेही विद्युत उपकरण घेताना त्या उपकरणाची दुरुस्ती आणि आफ्टर सेल्स सर्व्हिस महत्वाची आहे. कंपनीनुसार फ्रीजचं सरासरी आयुष्य साधारणपणे ७-१० वर्षे असतं. पण बऱ्याचदा त्यापेक्षा जास्त काळ फ्रीज चालतो. फ्रीज विकत घेताना फ्रीजची रिपेअर हिस्टरीचाही विचार करावा. आपल्या आसपासच्या व्यक्तींकडे चौकशी केली की, “साधारण किती दिवसात ह्या प्रकारच्या फ्रीजला दुरुस्तीचं कामं निघालं होतं, फ्रीज दुरुस्तीसाठी कंपनीकडून कितपत सहकार्य मिळतं.” तर अश्या प्रकारची अत्यंत उपयुक्त माहिती मिळू शकते. हल्ली इंटरनेटवरही अशी माहिती सहज उपलब्ध होऊ शकते.

रिव्ह्यू :

बऱ्याचदा आपण इंटरनेट वर असणाऱ्या प्रतिक्रिया वाचून गोष्टी विकत घ्यायला जातो. पण इंटरनेटच्या काही वेबसाईट्स वर असणारे रिव्ह्यू हे पेड रिव्ह्यू असतात. परंतु, काही वेबसाईट्स अश्या असतात जिथे सामान्य ग्राहक स्वतः त्यांची प्रतिक्रिया नोंदवतात. फक्त अश्याच वेबसाईट्सचा वापर करावा. रिव्ह्यू वाचताना मुख्य गोष्ट लक्षात घ्यावी ती म्हणजे उपकरण घेतल्यापासून किती दिवसांत हा रिव्ह्यू दिलेला आहे. सुरुवातीच्या काळात सगळी उपकरणे उत्तम चालतात. खरा प्रश्न असतो वॉरंटी संपल्यावरचा. त्यामुळे ज्यांनी एखादा वर्ष उपकरण वापरलेलं आहे, अश्या लोकांच्या प्रतिक्रियांना जास्त महत्व द्यावे.

फ्रीज खरेदीची वेळ :

फ्रीज तयार करणाऱ्या कंपन्या बाजाराचा आढावा घेऊनच नवीन मॉडेल्स बनवत असतात आणि ते बाजारात आणत असतात. त्यामुळे आपल्याकडे साधारणपणे उन्हाळ्याच्या सुरुवातीस फ्रीज, एसी, कूलर अश्या सगळ्या गोष्टींचे नवीन मॉडेल्स बाजारात येतात. त्यामुळे अश्या वेळी जर नवीन फ्रीज घ्यायला गेलो तर आपल्याला नवीन मॉडेल आणि पर्यायाने नवीन किंवा लेटेस्ट फिचर असणारे फ्रीज मिळू शकतात आणि मग पुढचे अनेक वर्ष आपल्याला साथ देऊ शकतात. (एक फ्रीज कंपनीच्या म्हणण्यानुसार साधारणपणे ७-१० वर्षे टिकू शकतो आणि आपल्या मते कितीही… म्हणजे आपण चालवू तितके दिवस.. 😉 त्यामुळे जास्तीत जास्त लेटेस्ट फिचर असणारा फ्रीज घेतला तरी पुढचे काही वर्ष तरी त्रास होत नाही.)

हल्ली भारतीय सणवार लक्षात घेऊन प्रत्येका सणांसाठी म्हणून बाजारात बऱ्याच ऑफर्स चालू असतात दसरा, दिवाळी, गुढीपाडवा ह्यासारख्या सणांना किमतीत विशेष सवलत दिली जाते. त्यामुळे शक्य असेल तर अश्या वेळेपर्यंत थांबावे. बऱ्याचदा ह्या सवलतींमध्ये वॉरंटीचा काळ वाढवून दिला जातो. जर तसं मिळत असेल तर इतर भेटवस्तूंच्या मोहात न पडता वॉरंटीचा काळ अवश्य वाढवून घ्या. दरवेळी असे योग्य वेळेसाठी आणि सवलतींसाठी थांबता येतेच असे नाही. एखाद्या वेळी फ्रीजने अचानक असहकार पुकारला की तात्काळ फ्रीज खरेदी करावी लागते.

बजेट :

बजेट न ठरवता बाजारात गेलो तर हमखास जास्त किमतीचं घेतलं जातं. म्हणून आधीच अंदाज घेऊन बजेट ठरवून गेलो तर नवीन गोष्टींची भुरळ पडून अनावश्यक खर्च थांबवला जाऊ शकतो. हल्ली बाजारात खूप साऱ्या सवलतींचा भडीमार चालू असतो. अमुक एका क्रेडीट कार्डवर इतकी सवलत आणि इ एम आय वगैरे. खूप विचार करून आणि छुपे खर्च लक्षात घेऊन ह्या पर्यायांची निवड करावी लागते. आपण योग्य सवलत निवडू शकलो तर त्यासारखी दुसरी गोष्ट नाही. बाजरात जाऊन जशी आपण उपकरणांची किंमत विचारतो तसंच त्याला लागू असणारे टॅक्सेस, वाहतुकीचा खर्च आणि इतर काही शुल्क भरावे लागतील का? हा प्रश्न किमान तीन वेळा विचारावा. आयत्या वेळी घरी उपकरण आणून दिल्यानंतर अचानक जादाचे पैसे मागितले जातात ज्याची पूर्वकल्पना आपल्याला देण्यात आलेली नसते. त्यामुळे आपण स्वतःहून दुकानात ह्या सर्व गोष्टींची चौकशी करावी. मी हल्ली एक प्रश्न ठरवून ठेवलाय, एकदा का उपकरणाची फायनल किंमत कळली की, “हे सोडून आम्हाला कशाचे पैसे द्यावे लागतील का?” असं मी किमान दोन वेळा तरी विचारते. म्हणजे छुपे कोणतेही खर्च (उपकरणाच्या वाहतुकीचा खर्च किंवा वरच्या मजल्यांवर चढवायचे असल्यास त्याचा खर्च, ) असतील तर ते त्याच वेळी लक्षात येतात.

फ्रीजचे फिचर :

फ्रीज विकत घेताना काही महत्वाचे फीचर्स/गोष्टी आपण बघायला हव्या, ते म्हणजे:

  • आधुनिक पद्धतीचे तापमान नियंत्रक (digital temperature control);
  • फ्रोस्ट फ्री सिसस्टीम;
  • जास्त प्रमाणात प्रकाश आणि कमी प्रमाणता उष्णता निर्माण करणारे एलइडी लाईट;
  • दार संपुर्ण बंद झालं नाही तर ते आपल्याला कळावे म्हणून अलार्म;
  • फ्रीजमधील कप्पे आपल्याला हव्या त्या पद्धतीने (मापात) हलवता येतील अशी सोय;
  • वेगवेगळ्या गोष्टी ठेवण्यासाठी वेगवेगळे तापमान असणारे विभाग (संपुर्ण फ्रीजला एकच टेम्परेचर कॉन्ट्रोल असेल तर बर्फ आणि ताज्या भाज्या सर्वांसाठी एकच तापमान राहते त्यामुळे आपल्यला तापमान ठरवणे अवघड जाते. जर कमी तापमान ठेवले तर बर्फ पटकन होतो पण फ्रीजमधील ताज्या भाज्या पण गोठून जातात.) त्यासोबतच फ्रीजचा फ्लक्चुएशन स्कोअर बघावा. फ्रीजमधील तापमान जेवढं स्थिर असेल तेवढं ते आतील अन्नपदार्थांसाठी उत्तम असेल. फ्लक्चुएशन स्कोअर जेवढा स्थिर असेल तेवढं तापमान स्थिर असते;
  • फळे आणि भाज्या ठेवण्यासाठी आर्द्रता नियंत्रक/ क्रीस्पर;
  • फ्रीजच्या स्वच्छतेच्या वेळी सहज काढता आणि लावता येतील अश्याच पद्धतीचे रॅक, फळ्या किंवा कुठल्याही प्रकारचे कप्पे;
  • पदार्थांना एकमेकांचा वास लागू नये किंवा फ्रीजला पदार्थांचा वास लागू नये म्हणून काही नवीन सुविधा असतात (deodorisation system );
  • इन्व्हर्टर टेकनॉलॉजी;
  • विद्युत उर्जेचा होणारा वापर किंवा स्टार रेटिंग;
  • मशीनचा होणारा आवाज;
  • किती पावरचा इलेक्ट्रिक पॉईंट लागेल;

शाळेमध्ये उत्तरपत्रिका लिहिताना आम्हाला बाई सांगायच्या, “मुद्देसूद लिहा, उगाच फापटपसारा लिहित बसू नका कारण आपल्याच शब्दात आपण अडकतो.” तसच काहीसं फीचर्सचं आहे. जेवढे जास्त फीचर्स घेऊ तेवढे जास्त ते बिघडण्याची शक्याता आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या पुढील अडचणी. म्हणूनच जेवढे गरजेचे आहेत तेवढेच फीचर्स घ्यावेत असं मला वाटतं.

विद्युत उर्जेचा वापर :

फ्रीज चालू असताना होत असणारा विजेचा वापर हा अत्यंत महत्वाचा भाग असतो. हल्ली फ्रीज खरेदीला गेल्यावर त्यावर पाच स्टार असेलेलं एक चिन्ह असतं आणि त्यावर असणाऱ्या रेटिंगवरून एखादा फ्रीज चालू असताना किती विद्युत उर्जा खर्च होते याचा अंदाज लावता येतो. ह्या स्टार रेटिंगचा जरूर विचार करावा जेणे करून महिन्याला येणारे विजेचे बिल आवाक्यात राहील आणि विजेचा अपव्यय होणार नाही.

जसा जसा फ्रीजचा आकार वाढत जातो त्या प्रमाणात विद्युत उर्जेचा वापर वाढत जातो. तसच, गरजेपेक्षा मोठा फ्रीज घेतला तर फ्रीजमधील जागा रिकामी राहते आणि त्यामुळे पर्यायाने विजेचा जास्त वापर होईल. म्हणूनच योग्य आकारमानाचा फ्रीज घेणे गरजेचे असते.

टिप्स :

१. जर तुम्हाला अमुक एक गोष्ट अमुक एका भांड्यातच ठेवायची सवय असेल आणि अशी ठरलेली भांडी असतील तर महत्वाच्या भांड्यांची मापे सोबत ठेवा म्हणजे आपल्या घरातील भांडी ह्यात मावतील का नाही हे कळेल. किंवा जर फ्रीज घेतलेला असेल तर फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी भांडी विकत घेताना फ्रिजच्या कप्प्यांची मापे सोबत ठेवा. माझ्या मावशीकडे सगळ्यांना आंब्याचा रस खूप आवडतो. दुपारच्या जेवणानंतर आमरस काढून ठेवायला मोठं भांडं लागायचं. ते भांडं स्टीलचं चालायचं नाही कारण त्यामुळे आमरस काळा पडतो. तेव्हा माझ्या मावशीने फ्रिजच्या कप्प्यांची चक्क मापं घेतली आणि बाजारातून दोन काचेचे जार आणले.

२. फ्रीज ज्या ठिकाणी ठेवायचा आहे त्याच्या सर्व बाजूने किमान पाव इंच रिकामी जागा असावी जेणे करून हवा खेळती राहील.

३. फ्रीजमध्ये भाज्या ठेवण्यासाठी मी कापडी पिशव्यांचा वापर करते. टर्किशच्या टॉवेलशी मिळत जुळतं असं हे मटेरीअल आहे. ह्या पिशव्या ओल्या करून त्यात भाजी ठेवायची आणि त्या पिशव्या भाजीच्या ड्रॉवरमध्ये ठेवायच्या. भाजी खूप उत्तम राहते.

४. आपलं राहणीमान, आपल्या सवई काय आहेत, आपल्याला कुठले आजार आहेत का? म्हणजे पाठीच्या तक्रारी असल्यास आपण खाली वाकू शकत नाही वगैरे या सर्व गोष्टींचा विचार करावा.

५. फ्रिजच्या दाराचे हॅन्डल्स खूप वर किंवा खूप खाली नाहीत ना ? आणि आपल्याला उघडताना सोपे जाईल ना याचा विचार करावा. बऱ्याचदा हात खरकटा असल्याने आपण पूर्ण ताकदीने फ्रीजचे दार उघडू शकत नाही. काही जणांना डाव्या हाताने काम करायची सवय असते अश्यावेळी दाराचे हॅन्डल्स आपल्याला उघडायला सोपे जातील ना ह्याचा विचार जरूर करावा. आपण अगदी सहजरीत्या दार उघडू शकू अश्या प्रकारचे हॅन्डल्स असावेत. बाजारात किंवा दुकानात डिस्प्लेला लावलेले फ्रीज हे शक्यतो बंद असतात किंवा डिस्प्लेसाठी नुसते ठेवलेले असतात. अश्या प्रकारचे बंद फ्रीज उघडणे जास्त सोपे असते पण चालू फ्रीज उघडायला तुलनेत जरा ताकद लागते.

ह्या सर्व गोष्टींचा एकत्रितपणे विचार केला तर आपल्याला योग्य फ्रीज घेण्यासाठी मदत होते. ह्या फ्रीजखरेदीच्या लेख मालिकेत आपण फ्रीजचा आणि फ्रीज खरेदीचा अनेक अंगाने विचार केला. आता आपण बघणार आहोत फ्रीज खरेदीचे टप्पे. तेव्हा लवकरच भेटू एका नव्या कोऱ्या सदरामध्ये…..!!!!!

Related Posts

आपल्या प्रतिक्रिया/ कॉमेंट आपण इथे नोंदवू शकता

Your email address will not be published.

https://teamradioshack.com/ https://lit.link/en/totoagung2slot https://linkby.tw/qdal88.slot https://heylink.me/totoagung-situs-slot-online-gacor-terbaik-terpercaya/ https://linklist.bio/daftar-slot-4d https://heylink.me/bocoran-slot-gacor-hari-ini-situs-judi-online-restoslot4d/ https://ffm.bio/daftar-restoslot4d https://linkby.tw/totoagung2slot https://new.c.mi.com/th/post/114045 https://instabio.cc/cantiktoto-link https://s.id/Slotgacor4DOfficial https://naturalhistorymag.com/artdepartment/freebet-tanpa-deposit/ https://instabio.cc/link-daftar-amintoto https://heylink.me/restoslot4d-situs-pay4d-resmi-paling-gacor-indonesia/ https://idolink.com/slotgacor4dofficial https://allmy.bio/IDN-Slot-online-amintoto https://linkby.tw/amintoto-link-alternatif https://naturalhistorymag.com/content/spaceman-pragmatic/ https://wlo.link/@restoslot4d_gacor https://mssg.me/amintoto-slot-online https://akangzeyus.com/ https://heylink.me/cantiktoto-bandar-slot-online-gacor-resmi-idnplay/ https://heylink.me/link-alternatif-slot-pay4d/ https://idolink.com/qdal88slot https://ffm.bio/cantiktoto_slot https://heylink.me/agen-slot-demo-pragmatic-terpercaya-qdal88/ https://heylink.me/totoagung2-situs-slot-online-resmi-gacor-terpercaya-menang/ https://heylink.me/qdal88-situs-slot-gacor-online-freebet-tanpa-deposit/ https://solo.to/totoagung-slot https://lit.link/en/qdal88link https://heylink.me/restoslot4d-daftar-situs-slot-gacor-online-pay4d/ https://idolink.com/slothoki https://antartidargentina.com/ https://s.id/amintoto-slot-online https://blog.motorola.de/wp-content/slot-gacor-4d/ https://lynk.id/qdal88_slot_pulsa https://lynk.id/daftar_slot_4d https://instabio.cc/totoagung2-slot https://linkr.bio/restoslot4d-login https://idolink.com/totoagung2slot https://heylink.me/link-alternatif-slot-online-gacor-cantiktoto/ https://heylink.me/situs-slotgacor-4d-gampang-menang-maxwin/ https://ffm.bio/amintoto_official https://naturalhistorymag.com/content/slot-gacor/ https://lynk.id/totoagung_link https://allmy.bio/Slotgacor4dOfficial https://heylink.me/link-slot-gacor-totoagung2-pusat-game-terlengkap/ https://s.id/daftar-restoslot4d https://lynk.id/cantiktoto https://heylink.me/link-alternatif-situs-slot-gacor-online-amintoto/ https://heylink.me/slotgacor4d-situs-slot-online-gampang-menang-resmi-pay4d/ https://motivasiagung.com/ https://allmy.bio/cantiktoto-slot https://heylink.me/totoagung-situs-slot-online-resmi-pusat-pragmatic-play/ https://replit.com/@totoagung2slot https://mssg.me/cantiktoto_slot https://ffm.bio/qdal88_slot4d https://heylink.me/link-alternatif-resmi-restoslot4d-terbaik-gampang-menang https://wlo.link/@totoagung_slot https://lit.link/en/amintotoslotonline https://news-business.co.uk/slot-gacor-4d/ https://heylink.me/totoagung-situs-slot-online-resmi/ https://heylink.me/cantiktoto-situs-slot-online-terpercaya-gacor-lisensi-resmi/ https://heylink.me/agen-slot-pay4d/ https://jemi.so/amintoto-situs-slot-online-terpercaya https://new.c.mi.com/th/post/113199 https://raizeducacao.com.br/freebet-slot/ https://linkby.tw/cantiktotolink https://allmy.bio/qdal88-slot https://lynk.id/totoagung_slot https://jemi.so/cantiktotositusjudislotonlineterpercayaslotgacorpragmaticplayterbaikdiindonesia https://brainwavelove.com/ https://bandungheritage.org/ https://lynk.id/amintotoofficial https://solo.to/amintoto_official https://replit.com/@cantiktotogacor https://replit.com/@totoagungslot https://allmy.bio/totoagung2-slot https://linklist.bio/amintoto_link_daftar https://slotgacor4d.com/ https://ffm.bio/totoagung2_slot https://heylink.me/situs-slot-gacor4d-resmi-mudah-menang/ https://heylink.me/bocoran-situs-slot-gacor-gampang-menang-cantiktoto/ https://new.c.mi.com/th/post/116758 https://linklist.bio/qdal88-slot https://linkby.tw/totoagung-slot https://www.printersupportpro.us/blog/wp-content/uploads/slot-idn/ https://www.soulrichwoman.com/slotgacor4d/ https://skillscanada.bc.ca/idn-slot/ https://replit.com/@Slotgacor4doff https://linklist.bio/totoagung2_slot https://idolink.com/cantiktotoslot https://heylink.me/situs-slot-gacor-4d-gampang-menang/ https://heylink.me/daftar-slot-online-gacor-akun-vip-qdal88/ https://linktr.ee/totoagung2 https://naturalhistorymag.com/htmlsite/slot88-gacor/ https://mssg.me/qdal88-situs-judi-slot-paling-gacor-hari-ini https://heylink.me/slot-demo-pragmatic-qdal88-gratis-tanpa-deposit/ https://s.id/cantiktoto_slot https://linkby.tw/slotgacor4d.official https://heylink.me/cantiktoto/ https://heylink.me/link-alternatif-slot-pay4d/ https://linkr.bio/qdal88-slot4d https://idolink.com/amintotodaftarslotonline https://linklist.bio/Slotgacor4DOfficial https://linklist.bio/totoagung-slot https://heylink.me/qdal88/ https://meelink.bio/slot-gacor-maxwin https://mssg.me/totoagung2_slot https://heylink.me/daftar-slot-gacor-vip-khusus-situs-totoagung2/ https://s.id/totoagung-slot https://agungsport.com/ https://jemi.so/restoslot4dgacor https://heylink.me/totoagung_situs_deposit_pulsa/ https://produkvvip.com/ http://ptos.kimia.gov.my/css/sass/slot-pulsa/ https://heylink.me/qdal88.gampang.hoki/ https://heylink.me/SlotGacor4D/ https://heylink.me/bocoran-slot-gacor-pagi-siang-malam-hari-ini-amintoto/ https://instabio.cc/daftar-slot-4d https://solo.to/totoagung2_slot https://heylink.me/slot-gacor-online-rtp-tertinggi-situs-judi-amintoto/ https://skskismizamanli.cumhuriyet.edu.tr/image/demo/slot-pulsa/ https://wlo.link/@cantiktoto_slot https://lit.link/slotgacor4dnew https://ffm.bio/slotgacor4dofficial https://replit.com/@Resto4d https://solo.to/qdal88-slot https://heylink.me/totoagung2-situs-judi-slot-online-gacor-indonesia/ https://heylink.me/amintoto-daftar-situs-slot-online-gacor-indonesia/ https://heylink.me/restoslot4d-rtp-live-slot-gacor-tertinggi-hari-ini/ https://instabio.cc/Slotgacor4DOfficial https://allmy.bio/totoagung-slot https://naturalhistorymag.com/htmlsite/bo-slot-gacor/ https://linkby.tw/daftar_restoslot4d https://idolink.com/totoagungslot https://solo.to/resto-slot-4d https://heylink.me/link-slot-online-gacor-terpercaya-totoagung/ https://heylink.me/agen-slot-gacor-terkuat-totoagung-gampang-menang/ https://replit.com/@qdal88link https://ffm.bio/totoagung-slot https://heylink.me/cantiktoto-link-slot-online-gacor-terpercaya-resmi-idnplay/ https://solo.to/slotgacor4dofficial https://mssg.me/totoagung-situs-slot-online-paling-gacor https://heylink.me/link-alternatif-slot-freebet-qdal88/ https://instabio.cc/totoagung-slot https://instabio.cc/qdal88-slot https://lit.link/en/restoslot4dterpercaya https://heylink.me/amintoto-situs-slot-online-terpercaya-gampang-menang/ https://mssg.me/slotgacor4dofficial http://bpp346.bpp.police.go.th/slot-gacor-maxwin/ https://heylink.me/agen-slot-pay4d/ https://lit.link/en/cantiktotolink https://replit.com/@AmintotoDaftar https://mssg.me/slot-hoki-restoslot4d https://lynk.id/totoagung2_slot https://lynk.id/slotgacor4dofficial https://heylink.me/situs-slot-demo-gratis-totoagung2/