फ्रीज खरेदीसाठी बाहेर पडताना (आपल्या गरजा समजून घेण्यासठी) थोडासा घरचा अभ्यास करावा लागतो. फ्रीज खरेदीसाठी बाहेर पडताना सगळ्यात महत्वाचा विचार म्हणजे फ्रीजचा आकार. फ्रीजचा आकार ठरवताना खूपसाऱ्या बारीक सारीक गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात.
फ्रीजचे आकारमान ठरवताना :
१. फ्रीज ठेवण्यासाठी घरात असणारी जागा. जर आपण जुना फ्रीज देऊन नवीन घेत असू, तर जुन्या फ्रीजचे आकारमान म्हणजे लांबी x रुंदी x खोली याचा विचार करावा लागेल म्हणजे नवीन फ्रीज मोठ्या आकाराचा घ्यायचा असेल तर तेवढी जागा उपलब्ध आहे का ते लक्षात येते. आपण जिथे फ्रीज ठेवणार आहोत तिथली लांबी x रुंदी x खोली जर मोजून त्या जागेची मापं सोबत ठेवली तर बरेच सोपे जाते.
२. फ्रीज जिथे ठेवायचा आहे तिथली मापं तर लक्षात घ्यावीच लागतात पण त्यासोबतच आपल्या घराच्या मुख्य दरवाज्याचे माप आणि मुख्य दरवाज्यापासून फ्रिजच्या जागेपर्यंत यायचा रस्ता हे देखील लक्षात घ्यावे लागते. आमच्या ओळखीत दोन जणांना, मोठ्या आकाराचा फ्रीज घेतल्यामुळे मुख्य दरवाज्यातून आत नेताना खूप त्रास झाला होता. तेव्हा घराच्या मुख्य दरवाज्याचे माप आणि मुख्य दरवाज्यापासून फ्रिजच्या जागेपर्यंत यायचा रस्ता यांची मापेसुद्धा लक्षात घ्यावीत.
३. फ्रीजचा दरवाजा साधारण १८० अंशात उघडतो. त्यामुळे फक्त फ्रीजची लांबी x रुंदी x खोलीचा विचार करून चालत नाही. फ्रीजचा दरवाजा पूर्ण उघडू शकेल एवढी जागा बाजूला सोडावी लागते. थोडक्यात फ्रिजच्या दराचा प्ले लक्षात घ्यावा. जर फ्रीजचा दरवाजा पूर्ण फिरायला जागा नसेल तर हल्ली साईड बाय साईड दरवाजे असणारे फ्रीज मिळतात त्याचाही आपण विचार करू शकतो.
४. घरात किती माणसं राहतात ह्यावरून फ्रीज किती लिटरचा घ्यावा हे ठरवावं लागतं. एका फ्रीजविक्रेत्या काकांनी दिलेल्या माहितीनुसार माणसांची संख्या आणि त्या प्रमाणात फ्रीजची लिटरमेधील क्षमता व त्याचे ढोबळ अंदाज खालीलप्रमाणे :
माणसांची संख्या | फ्रीजचे आकारमान (लिटरमध्ये) |
---|---|
१ | २००-२३० |
२ | २६० |
३ | २९० |
४ | ३०० |
५ | ३५० |
६ | ४०० |
७ | ४५० |
८ | ५०० |
९ | ५५० |
१० | ६०० |
११ | ६५० |
१२ | ७०० |
५. जसं घरात किती माणसं राहतात ह्यावरून फ्रीज किती क्षमतेचा घ्यायचा हे ठरवावं लागतं तसंच घरात पाहुण्यांची आवक जावक किती आहे आणि पर्यायने घरात किती माणसांचा स्वयंपाक होतो हे देखील विचारात घ्यावे लागेल. घरात समजा चारच माणसे राहत असतील पण खूप पाहुणे येत असतील किंवा आपण १५-२० पाहुण्यांचा (साधारण) स्वयंपाक नेहमी घरी करत असू तर मात्र फ्रीजचा आकार मोठा घ्यावा लागेल. करण जास्त माणसांच्या स्वयंपाकसाठी लागणारी पूर्वतयारी अथवा तयार केलेला स्वयंपाक फ्रीजमध्ये मावला पाहिजे.
६. आपण कोणत्या प्रकारचा आहार करतो, आपल्या कुटुंबाच्या खाण्यापिण्याच्या सवाई काय आहेत ह्यावरून फ्रीजमध्ये काय काय मावणं अपेक्षित आहे याचा अंदाज येतो. जर मांसाहार करत असू तर अश्या लोकांसाठी फ्रीजमध्ये ‘मिट कीपर’ असा निराळा भाग असते किंवा काहींना फ्रीजमध्ये खूप चॉकलेट्स/ आइसक्रीम (किंवा आपापल्या आवडीनुसार इतर अनेक गोष्टी) ठेवायची सवय असते मग त्यासाठी फ्रीजरमधील जागा अडली जाते. जर फ्रीजमध्ये वाइन ठेवत असाल तर त्यासाठी सुध्दा वेगळी जागा करून ठेवावी लागते. खूप आवडीने वाइन पीत असू तर फ्रीजमध्ये वाइनच्या बॉटल्स ठेवायला वेगळी सोय असते किंवा वाइन रॅक्स मिळतात. मग अश्या सगळ्या आवडीनिवडी आणि गरजा लक्षात घेऊन फ्रीज निवडला तर उपयोगी पडू शकते.
वरील सर्व चर्चा झाली फक्त फ्रिजच्या आकारमानाबद्दल. फ्रीजचे प्रकार आणि इतर गोष्टींवर चर्चा करण्यासाठी पुन्हा भेटू पुढच्या सदरामध्ये…!!!
Rekha Chaudhari
Useful information
घ घराचा
धन्यवाद
घ घराचा
धन्यवाद
Rothity
vip casino
RaliRile
vip casino
Lydayhed
vip casino