माझी आई बऱ्याचदा एक अस्सल मराठवाडी म्हण वापरते, ‘असल ते इटवा अन नसल ते भेटवा’. खरंतर हा मानवी स्वभावच आहे असं मला वाटतं. ऑफिसमध्ये बसून कामामध्ये बुडालेलो असताना आपल्यातल्या कित्येक जणांना आपली विषलिस्ट किंवा बकेटलिस्ट आठवत असते…. (अगदी माझ्यासकट). सुट्ट्या घेऊन अमुक अमुक शिकूया हा तर माझा पेटंट प्लान. आता ही सक्तीची सुट्टी चालू असताना इतका वेळ मिळतोय की नेमकं काय काय करायचं हेच कळत नाहिए… माझ्या आवडत्या विषयांवर वाचन आणि अभ्यास चालू आहेच. घरात नवीन नवीन पदार्थ पण ट्राय करून बघत आहे. मीच केलेल्या कामाच्या याद्या मला हळूहळू सापडत आहेत 😉 आणि त्यानुसार घरातल्याही बारीकसारीक गोष्टी आवरत आहे. आवडत्या विषयांचं वाचन करायला बसलं की वेळ कुठे निघून जातो हे कळतही नाही आणि ह्या सक्तीच्या रजेचा संपूर्ण सदुपयोग झाल्यासारखं वाटतं. दुपारच्या जेवणानंतर वाचायला घेतलं की झोप येते म्हणून आवराआवरी करावी असा डोक्यात विचार आला आणि आज माझ्या कानातल्यांचा पसारा आवरायला काढला.
जोडीतलं एक हरवलेलं असे कानातले बाजूला काढले, फिरक्या नसलेले कानातले बाजूला ठेवले, ज्या नुसत्या (जादाच्या) फिरक्या होत्या त्या एका पिशवीत ठेवल्या आणि कानातल्यांचे वर्गीकरण सुरु केले:
१. रोजच्या वापरासाठीचे कानातले
२. कार्यक्रमासाठीचे कानातले
३. वेस्टन फोर्मल्सवर घालण्यासाठीचे कानातले
हे वर्गीकरण झाल्यानंतर त्याचे परत उपविभाग केले. म्हणजे रोजच्या वापरासाठी वेगळे काढलेले कानातले पुन्हा सहा भागात विभागले. माझ्याकडे सोनेरी रंगाचे कानातले फार नाहीत. त्यामुळे त्याचा एकच भाग केला आणि बाकीचे खालीलप्रमाणे वेगवेगळे करून ठेवले.
– संपूर्ण चंदेरी/चांदीचे कानातले
• टाॅप्स
• मोठे किंवा लोंबते
– रंगीत (चंदेरी कानातले)
• टाॅप्स
• मोठे किंवा लोंबते
– संपूर्ण सोनेरी कानातले
– रंगीत (सोनेरी कानातले )
• टाॅप्स
• मोठे किंवा लोंबते
– मोत्याचे कानातले
• टाॅप्स
• मोठे किंवा लोंबते
– खड्यांचे कानातले
• टाॅप्स
• मोठे किंवा लोंबते
आता कोणत्याही समारंभाला जाताना कानातले निवडणं सोपं होईल आणि खरेदी करताना मनाला / इच्छेला आळा घालणं सुद्धा…. 😉 !!!!!
आवराआवरी करतानाचा हा भाग मला खूप महत्वाचा वाटतो. आपण नियमितपणे आवरत असू तर खरेदी करताना अवाजवी खरेदी टाळता येऊ शकते कारण १. ते ठेवायला जागा नसते हे आपल्याला रीअलाईज झालेलं असतं २. मागच्या वेळी असंच आपण उत्साहात घेतलेल्या वस्तू घरात अजूनही तश्याच पडून आहेत ह्याची जाणीव असते. ३. अवास्तव खर्च टाळता येऊ शकतो. मी आवराआवरी करते त्यातल्या मोटीव्हेशनचा हा एक महत्वाचा भाग आहे.
तुमचं आवराआवरी करतानाचं मोटीव्हेशन काय आहे? खाली कमेंटमध्ये जरूर लिहा.
आणि अर्थातच घरी राहा, सांभाळून राहा स्वतःची आणि आपल्या कुटुंबियांची काळजी घ्या.
तळटीप : कानातल्यांना दुर्दैवाने प्लास्टिकच्या पिशवीत ठेवावं लागतं नाहीतर ते खराब होतात. विशेषतः चांदीचे कानातले. तुम्हाला ह्यावर दुसरा कोणता उपाय माहित असेल तर जरूर कळवा.
माझ्या कानात्ल्यांवरून अथवा त्यांच्या संख्येवरून डोंट जज मी हं….!!
#घघराचा #नियोजनामागचेप्रयोजन
Sandra
Thank you for the detailed information, it is very valuable. https://rentry.co/8xkch