बाजारात गेल्यावर कपडे विकत घेताना “हे धुवायचे कसे ?” हा विचार बहुतेकवेळा सगळ्यात शेवटी येतो. मी लहान असताना, आमच्याकडे, कपडे धुताना त्याचं वर्गीकरण हे फक्त उंची कपडे किंवा सण-समारंभासाठीचे कपडे आणि रोजच्या वापरातले कपडे एवढच होतं. हळूहळू ह्या “cleaning symbols” चा शिरकाव व्हायला लागला आणि हे वर्गीकरण वाढत गेलं. आता आपण बाजारात गेलो की बहुदा प्रत्येका ड्रेसला, कपड्यांना ही पांढरी पट्टी लावलेली असतेच आणि त्यावर विशिष्ट संकेतचिन्ह असतात. आज आपण बोलणार आहोत ह्या संकेंतचिन्हांविषयी.
मी ह्या खुणा दोन भागात विभागलेल्या आहेत :
१. प्राथमिक चिन्ह / मुख्य चिन्ह
१ | कपडे धुण्यासाठी | ![]() |
२ | कपड्यांना ब्लीच करण्यासाठी | ![]() |
३ | कपड्यांना ड्रायक्लीन करण्यासाठी | ![]() |
४ | कपडे वाळविण्यासाठी | ![]() |
५ | कपड्यांना इस्त्री करण्यासाठी | ![]() |
२. उप चिन्ह / इतर चिन्ह
१ | तापमान दर्शविण्यासाठी | ![]() |
२ | मशीन वॉश सायकल/मोड दर्शविण्यासाठी | ![]() |
३ | एखादी गोष्ट करू नये हे दर्शविण्यासाठी | ![]() |
प्राथमिक चिन्ह / मुख्य चिन्ह आणि उप चिन्ह / इतर चिन्ह ह्या दोन प्रकारातील चिन्ह जेव्हा एकमेकांबरोबर वापरली जातात तेव्हा हे “क्लिनिंग सिम्बॉल्स” तयार होतात.
उदाहरणार्थ
मुख्य चिन्ह | + | तापमान दर्शविणारे चिन्ह | = | कपड्यांना इस्त्री करताना इत्रीचे तापमान किती असावे |
![]() |
+ | ![]() |
= | ![]() |
कपड्यांच्या स्वच्छतेबाबतीत अश्या प्रकारे तयार होणारे संकेतचिन्ह आणि त्यांचे अर्थ आपण समजून घेणार आहोत. हे संकेतचिन्ह तीन मुख्य भागात विभागले जातात :
१. कपडे धुण्यासाठी वापरण्यात येणारे चिन्ह
२. कपडे वाळवण्यासाठी वापरण्यात येणारे चिन्ह
३. कपडे इस्त्री करण्यासाठी वापरण्यात येणारे चिन्ह
आता ह्यातील प्रत्येक प्रकाराकडे आपण वळूया
कपडे धुण्यासाठी वापरण्यात येणारे संकेतचिन्ह:
कपडे धुण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या संकेतचिन्हांमध्ये मुख्य चिन्ह असतं ते बादलीच्या आकाराचं. अश्या बादलीच्या आकृतीमध्ये जर काही ठिपके असतील तर ते, कपडे धुताना पाण्याचे तापमान किती असावे हे दर्शवतात. त्यानंतर अश्या बदलीच्या आकाराच्या खालच्या बाजूला जर आडवी रेष/रेषा असतील तर त्या, मशीन वॉश करताना कोणते सायकल/मोड वापरावा हे सूचित करतात. म्हणजेच जर बादलीच्या आकृतीमध्ये एकच ठिपका आणि बादलीखाली दोन आडव्या रेषा असतील तर असे कपडे जेन्टल सायकल/मोड वापरून थंड पाण्यात धुवावेत.
अ] तापमान
१ | थंड/साध्या पाण्याने कपडे धुवावेत (नॉर्मल पाणी/ रूम टेम्परेचर) | ![]() |
२ | कोमट पाण्याने कपडे धुवावेत (साधारण २० º ते ३०º) | ![]() |
३ | गरम पाण्याने कपडे धुवावेत (साधारण ३० º ते ४०º) | ![]() |
४ | कडक/जास्त गरम पाण्याने कपडे धुवावेत (साधारण ४० º ते ६०º) | ![]() |
ब] मशीन वॉश करण्यासाठीचा मोड/सायकल
१ | रेग्युलर सायकल | ![]() |
२ | पर्मनंट प्रेस | ![]() |
३ | डेलिकेट | ![]() |
क] ब्लीच
१ | कोणत्याही प्रकारचे ब्लीच वापरले चालते/ अश्या कपड्यांना ब्लीच करू शकता | ![]() |
२ | नॉन क्लोरीन ब्लीच वापरावे | ![]() |
३ | ब्लीच करू नये | ![]() |
ड] ड्रायक्लीन
१ | कपड्यांना ड्रायक्लीनच करावे | ![]() |
२ | कपड्यांना ड्रायक्लीन करू नये | ![]() |
३ | वर्तुळातील ही अक्षरं कोणत्या पद्धतीने ड्रायक्लीन करावे हे दर्शवतात (काही ठिकाणी वर्तुळात ‘P’ हे इंग्रजी मुळाक्षर लिहिलेले असते त्याचा अर्थ ‘कपड्यांना फक्त ड्रायक्लीनच करावे’ असं असतो तर काही ठिकाणी वर्तुळात ‘F’ हे इंग्रजी मुळाक्षर लिहिलेले असते त्याचा अर्थ ‘ नेहमीच्या पद्धतीने ड्रायक्लीन करावे’ असा असतो.) |
![]() |
ड] इतर
१ | हाताने कपडे धुवावेत (मशीन वॉश करू नये) | ![]() |
२ | कपडे धुवू नयेत | ![]() |
कपडे वाळवण्यासाठी वापरण्यात येणारे संकेतचिन्ह:
कपडे धुताना कपड्याचा पोत, रंग ह्यावरून जश्या कपडे धुण्याच्या निरनिराळ्या पध्दती असतात तश्याच धुतलेले कपडे वाळत घालण्यासाठीसुद्धा असतात. आता आपण वळूया कपडे वाळवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या चिन्हांकडे.
बर्फाळ प्रदेशात कमी तापमानामुळे कपडे लवकर वाळत नाहीत. अश्यावेळी मशीनने कपडे वाळवले जातात त्यालाच टम्बल ड्रायर म्हणतात. कपड्याचा पोत आणि कोणत्या प्रकरचे कापड आहे (म्हणजे सुती, सिंथेटिक, वुलन इत्यादी) ह्यावरून कश्या पद्तीने टम्बल ड्राय करावे हे ठरविले जाते. रिकामा चौकोन हा कपडे वळवण्यासाठीचे संकेतचिन्ह आहे परंतू ह्याच चौकोनात एक वर्तुळ असेल तर असे कपडे टम्बल ड्रायरने वाळवू शकता.
अ] टम्बल ड्रायर
१ | उष्णतेचा वापर न करता कपडे वाळवावेत | ![]() |
२ | कमी तापमानाचा वापर करून कपडे वाळवावेत | ![]() |
३ | मध्यम तापमानात कपडे वाळवावेत | ![]() |
४ | जास्त तापमानाचा वापर करून कपडे वाळवावेत | ![]() |
५ | कोणत्याही तापमानाचा वापर करून कपडे वाळवले तरी चालतील | ![]() |
६ | टम्बल ड्रायरने कपडे वाळवू नयेत | ![]() |
हे सगळं झालं टम्बल ड्रायरबद्दल. पण बाकीच्या देशांमध्ये जिथे ऋतूबदल होत असतात किंवा उष्ण तापमान असते अश्या वेळेस टम्बल ड्रायरचा वापर करावा लागत नाही. आपण दोरीवरदेखील कपडे वाळत घालू शकतो. रूम टेम्परेचरला कपडे वाळत घालण्यासाठी खालील संकेतचिन्ह उपयोगी पडतात.
ब] कपडे वाळत घालण्याच्या इतर पद्धती
१ | लाईन ड्राय – दोरीवर कपडे वाळत घालावेत म्हणजे आपण नेहमी ज्या पद्धतीने घालतो तश्याच पद्धतीने कपडे वाळत घालावेत. | ![]() |
![]() |
२ | ड्रीप ड्राय – काही कपडे जोरात पिळल्यामुळे त्यांचे धागे खराब होतात किंवा त्यांना खूप चुण्या पडतात म्हणून अश्या प्रकारचे कपडे न पिळता फक्त निथळत ठेवावेत. | ![]() |
![]() |
३ | फ्लॅट ड्राय – काही कपडे उभेखुंटीला टांगले किंवा वाळत घातले की त्यातील धागे ताणले जातात उदाहरणार्थ स्वेटर. स्वेटरखे कपडे जर खूप ओढले गेले तर ते आकाराने मोठे होतात. काही वेळा कपड्याचा पोत नाजूक असल्याने ते खूप वेळ उभे अडकवून ठेवणे चांगले नसते. म्हणूनच आशय प्रकारचे कपडे न अडकवता ते कोणत्याही पृष्ठभागावर आडवे ठेवावेत आणि वाळू द्यावेत. | ![]() |
![]() |
४ | कपडे उन्हात किंवा कडक उन्हात वाळवू नयेत – कडपे उन्हात वाळवावेत म्हणजे त्यातील जंतू मारून जातात असे म्हटले जाते. परंतू काहीवेळा कडक उन्हामुळे कपड्याचा रंग उडतो किंवा त्यातला नाजुकपणा निघून जाऊन कपड्याचा पोत खडबडीत होतो. म्हणूनच अश्या प्रकारचे कपडे उन्हात वाळवू नयेत. | ![]() |
![]() |
५ | कपडे धुतल्यानंतर पिळू नयेत – कपडे धुतल्यानंतर त्यातले पाणी काढून टाकण्यासाठी आपण कपडे जास्तीत जास्त जोर लावून पिळतो. परंतू कपडे पिळत असताना कपड्याच्या पोतला धक्का लागण्याची शक्यात असते म्हणूनच असे कपडे न पिळता तसेच वाळत घालायचे असतात. | ![]() |
![]() |
६ | ह्यापैकी कोणत्याही पद्धतीने कपडे वाळवू नयेत. | ![]() |
कपडे इस्त्री करण्यासाठी वापरण्यात येणारे संकेतचिन्ह
कपडे धुवून आणि वाळवून झाल्यावर येतो शेवटचा टप्पा म्हणजे कपड्यांची इस्त्री. हल्ली सगळ्या प्रकारच्या आणि ब्रॅण्डच्या इस्त्रीवर वेगवेगळ्या कपड्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे सेटिंग असते.
अ] इस्त्री करण्यासाठीचे तापमान
१ | कमी तापमान किंवा लो सेटिंगवर इस्त्री करावी | ![]() |
२ | मध्यम किंवा मिडीअम सेटिंगवर इस्त्री करावी | ![]() |
३ | जास्त तापमान किंवा हाय सेटिंगवर इस्त्री करावी | ![]() |
४ | इस्त्री करताना पाण्याच्या वाफेचा वापर करू नये | ![]() |
५ | ह्या कपड्यांना इस्त्रीच करू नये. | ![]() |
हे चिन्ह जरी जगभर वापरले जात असले तरीसुद्धा ह्यात एक छोटासा फरक आढळतो. अमेरिकन पद्धतीप्रमाणे तापमान किंवा उष्णता दाखवण्यासाठी ठिपक्यांचा वापर केला जातो. ह्याउलट युरोपियन पद्धतीत तापमानाचा आकडा लिहिला जातो. त्यासोबतच मशीन वॉश सायकल सांगण्यासाठी अमेरिकन पद्धतीत मुख्य चिन्हाखाली आडव्या दोन रेषा (एकाखाली एक) काढलेल्या असतात तर युरोपियन पद्धतीत मुख्य चिन्हाखाली आडव्या दोन रेषा (एकानंतर एक) काढलेल्या असतात.
अमेरिकन पद्धत | युरोपियन पद्धत |
---|---|
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
आता ह्यापुढे कधीही, कोणतेही कपडे विकत घेताना तुमचंदेखील लक्ष ह्या स्वच्छतेच्या संकेतचिन्हांकडे जाईल. स्वच्छतेच्या संकेतचिन्हांवरचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. पुन्हा भेटू लवकरच एका नव्या सदरामध्ये..!!
स्वप्ना
खूपच छान माहिती.
धन्यवाद