Close

भांड्यांची स्वच्छता

  • Gha Gharacha

परवा मी स्वयंपाकघराच्या आवराआवरी विषयी बोलले होते. स्वयंपाकघराची आवराआवर करतानाचा मोठ्ठा टप्पा म्हणजे भांड्यांची स्वच्छता. त्याबद्दल अधिक लिहाल का? असं मला काही जणांनी विचारलं. घरातल्या एकंदरच आवराआवरीमध्ये आपली आवडती आणि नावडती कामं ठरलेली असतात. स्वयंपाकघराच्या आवराआवरीमध्ये माझं सगळ्यात नावडतं काम म्हणजे भांडी घासणं. त्यामुळे स्वयंपाकघर आवरताना एकदा का भांड्यांचा राडा आवरला की मला हुश्श वाटतं.

पूर्वी, आई जेवण झाल्यावर सिंकमध्ये पडलेली भांडी विसळून एकात एक घालून भांड्यांच्या जाळीत ठेवायला सांगायची. पाणी प्यायचे ग्लास, कप आणि काचेच्या वस्तू ह्यासाठी छोटी वेगळी जाळी होती. भांडी विसळून झाल्यावर बऱ्यापैकी स्वच्छ दिसायची आणि उद्या सकाळी रेखा मावशी नेमकं काय घासणार आहेत असा मला प्रश्न पडायचा. घरात रोजची भांडी घासायला जर मदतनीस असेल तर आपण एवढ्या उठाठेवा का करायच्या असा माझ्या आळसातून उत्पन्न झालेला प्रश्न मला कायम सतावत असे. परंतु, खाल्ल्या खाल्ल्या भांडी विसळून ठेवली नाहीत, तर अन्नाचे कण वाळतात, भांड्यांना चिकटून राहतात. पांढऱ्या किंवा फेंट रंगांची भांडी असतील तर तर्रीचे, हळदीचे किंवा डाळींबाचे डाग पडतात. कणिक मळून ठेवलेली परात, बटाटा खिसून ठेवलेली खिसणी, वाळलेला भाताचा डबा, आमटी खूप वेळा तापवल्यानंतरची कडांना काही प्रमाणात आटलेली आमटी साठून खराब झालेली पातेली ही काही एपिक उदाहरणं आहेत. त्यामुळे हळूहळू मला आईचं म्हणणं पटायला लागलं होतं. भांडी घासायला टाकताना त्यातलं खरकटं उरलेलं अन्न काढून, पाण्याखाली विसळून मगच एकात एक घालून ठेवायची. भांडी अशी एकात एक घालून ठेवल्याने :

– कमीत कमी जागेत जास्तीत जास्त भांडी मावू शकतात;
– भांडी वरवर विसळली असल्याने एकमेकात घालून ठेवली तरी फार खराब होत नाहीत;
– भांड्यांचा खूप मोठ्ठा ढीग / पसारा पाहून भांडी घासणाऱ्या व्यक्तीला दडपण येत नाही

खरकटं अन्न हातानी काढून टाकलेलं बऱ्याच जणांना आवडत नाही. त्यामुळे आपण चमच्याचा वापर करतो. पण त्यानेही कधीकधी नीट निघत नाही. अश्यावेळी सिलिकॉन स्क्रेपरसुद्धा वापरू शकतो. जास्त प्रमाणात भांडी असतील तर चमच्यापेक्षा सिलिकॉन स्क्रेपरचा उपयोग जास्त होतो. चमच्याने कदाचित चरेसुद्धा पडू शकतात.

भांडी घासण्यासाठी लागणाऱ्या सामानाची , साधनांची ही एक छोटीशी यादी केली आहे. आपापल्या गरजेनुसार त्यात कदाचित बदल करावा लागू शकतो. पण जास्तीत जास्त गोष्टींचा ह्यात समावेश करण्याचा प्रयत्न केला आहे. (आपण बऱ्याचदा गोष्टी त्यांच्या ब्रँडने ओळखतो पण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे ब्रँड प्रसिद्ध असल्याने मी कुठेच कोणत्याही ब्रँडचे नाव लिहिले नाही.)

साधन सामुग्री :
१. नॅप्किन्स
• घासलेली भांडी पुसण्यासाठी
• भांड्याच्या जाळीखाली ठेवण्यासाठी
• पेपर टॉवेल

२. साबण / क्लीनर/ पावडर / लिक्विड
• डिश सोप (रोजची भांडी घासण्यासाठी)
• चांदीची भांडी घासण्यासाठी
• तांब्या , पितळीची भांडी घासण्यासाठी
• बेकिंग सोडा
• व्हिनेगर

३. घसणी /ब्रश
• घसणी (तारेची किंवा नायलॉनची)
• स्क्रब पॅड
• स्पंज
• बॉटल क्लीनर ब्रश
• टूथ ब्रश
• सिलिकॉन स्क्रेपर
• स्क्वीजी

४. हॅंड ग्लोव्ज (वापरत असल्यास)
५. एप्रन (वापरत असल्यास)
६. स्वच्छ केलेली भांडी ठेवण्यासाठी जाळी /टब / स्टॅंड
७. वाईन ग्लास किंवा तत्सम ग्लाससाठी विशिष्ठ ड्रायिंग रॅक्ससुद्धा मिळतात.

भांडी घासताना :

काम जरी खूप असलं तरी ते ब्रेक डाऊन केलं किंवा विशिष्ठ पद्धत ठरवून (स्ट्रॅटीजी वापरून) करायची सवय लावली की त्याचा बोजा वाटत नाही. भांडी घासतानासुद्धा भांडी किती खराब झाली आहेत ह्यावरून त्याचा प्राधान्यक्रम ठरवावा असं मला वाटतं.
– पाणी प्यायची भांडी (तांब्या, पेला , फुलपात्र, ग्लास, जग, जार इत्यादी);
– काचेचे कप , ग्लास;
– ताटं, वाट्या, चमचे ( ज्यात खाल्लं किंवा जेवण केलं आहे अशी भांडी)
– कढई, पातेलं (ज्यात स्वयंपाक केला आहे अशी भांडी)
– तेलकट तुपट भांडी, करपलेली/जास्त खराब झालेली भांडी

ज्यात स्वयंपाक केला आहे अशी भांडी जास्त खराब होतात. त्यामुळे ती घासताना घसणीलाही जरा खरकटं लागतं, जरासा ओशट वास यायला लागतो आणि मग ही अशी भांडी घासल्यानंतर पाणी प्यायची किंवा कमी खराब झालेली भांडी घासली तर त्यावर तेलाचे तवंग येऊ शकतात किंवा त्याला ओशट वास येऊ शकतो. त्यामुळे जी भांडी कमी खराब झाली आहेत ती सगळ्यात आधी घासायची. भांडी घासत असताना साधारण एकसारख्या प्रकारची भांडी /वस्तू सलग/एकत्र घासल्याने ( म्हणजे सगळे कप एकत्र, सगळ्या प्लेट्स एकत्र धुवायच्या) धुतलेले भांडे मांडणं सोपं जातं .

आपण खूप वेगवेगळ्या मटेरिअलची भांडी वापरत असतो. त्या प्रत्येका मटेरीअलचं कंपोजीशन वेगळं असतं. त्यामुळे एकाच प्रकारची घासणी आणि डिशसोप सर्व प्रकारच्या भांड्यांना वापरता येत नाही. आपल्याकडे कोणकोणत्या प्रकारची भांडी आहेत, त्यांना घासण्यासाठी कोणकोणत्या प्रकारची डिशसोप, पावडर / लिक्विड आणि घसणी लागेल ह्याचा पूर्वविचार करून घरात स्वच्छतेचं साहित्य गोळा करून ठेवायला हवं. खरंतर ही गोष्ट खूप मोठ्ठी किंवा अवघड नाही. बाहेरून बघताना ही संकल्पना कितीही फॅन्सी वाटत असली तरीही ती एक गरज आहे. तारेच्या घसणीनं नॉनस्टीक तवा जोर लावून घासला तर त्याला नक्कीच चरे पडतील, त्याचं कोटिंग निघून जाईल. त्यामुळे हा सगळा विचार जरूर करावा असं मला वाटतं.

– स्टीलची भांडी
– जर्मनची / ॲल्युमिनीअमची भांडी
– तांब्या , पितळीची भांडी
– नॉनस्टीक भांडी
– काचेच्या वस्तू / भांडी
– विविध प्रकारचे तवे
– चांदीची भांडी

सर्व नाजूक आणि काचेच्या भांड्यांसाठी आपण स्पंजचा वापर करू शकतो. ही भांडी जोर लावून घासता येत नाहीत त्यामुळे अशी भांडी घासण्यापूर्वी त्यात थोडं साबणाचं पाणी घालून ठेवावं किंवा एका टबमध्ये / पसरट भांड्यात पाणी आणि २-४ थेंब डिशलिक्विड टाकून ही सगळी भांडी भिजवत ठेऊ शकतो. काही जणं पांढऱ्या रंगाचे काचेचे कप असतील तर घासून स्वच्छ केल्यानंतर लिंबाचं पाणी घेऊन त्यात हे कप उकळतात. हे disinfectant सारखं काम तर करतंच पण त्याच सोबत कप पांढरे शुभ्र राहतात.

करपलेली किंवा जळालेली भांडी असतील तर त्यात नुसतं पाणी टाकून एकदा उकळून घ्यायचं किंवा खूप खराब झालं असेल तर त्या पाण्यात मीठ टाकून उकळून घ्यायचं. मीठाऐवजी बेकिंग सोडा आणि थोडंसं डिश लिक्विड/ व्हेनिगर घातलं तरी चालतं आणि नंतर ते पाणी तसंच ठेवून काही वेळ भिजत ठेवायचं. एखाद्या वेळी जर घरातली तारेची घसणी खराब झाली असेल तर घरातल्या ॲल्युमिनीअम फाॅईलचा गोळा करून ( जी पोळीच्या डब्यात वगैरे वापर करून झालेली आहे अशीसुद्धा चालेल) त्यानेसुद्धा अशी भांडी व्यवस्थित निघू शकतात. जास्त तेलकट, तुपट भांड्यांनासुद्धा हीच पद्धत वापरू शकतो.

माझी आई चांदीची भांडी चक्क अंगाच्या साबणाने (मऊ स्पंजने) घासते. तिचं असं म्हणणं आहे की ही भांडी जास्त खराब नसतात आणि हार्श साबण वापरून किंवा तारेच्या घासण्या किंवा स्क्रबमुळे चांदी खराब होते. चरे पडायला लागतात. चांदी बाहेर ठेवली की हवेमुळे सारखी काळी पडत असल्याने सतत घासावी लागते. त्यामुळे त्यावर जास्त किंवा हार्श केमिकल्सचा मारा करू नये. कोणतीही भांडी धुतली की ती पुसून ठेवावीच लागतात परंतु, चांदीची आणि तांब्या पितळीची भांडी लगेचच पुसून घ्यावी लागतात नाहीतर त्यावर पाण्याचे डाग पडतात आणि ते पटकन उठून दिसतात.

चांदीची समई किंवा तुपाचं भांडं – चांदीची समई घासण्यापूर्वी टीशू पेपर ने पुसून घेतली तर त्यातलं तेल शोषलं जातं आणि मग जास्त जोर लावावा लागत नाही. टिश्यू पेपर ऐवाजी पिठीसाखर किंवा झेंडू वगैरेसारख्या जाड बुडाच्या फुलानेही हा चिकटपणा निघू शकतो. (अर्थातच फूल कोरडं हवं ओलं नको) इतरवेळी तेलकट तुपट डाग काढण्यासाठी लिंबाचा हमखास वापर करतात परंतु, चांदीच्या भांड्यांच्या स्वच्छतेमध्ये लिंबाचा वापर (त्यातल्या ॲसिडिक प्राॅपर्टीमुळे) वर्ज्य आहे. चांदीची इतर भांडी टूथपेस्ट / टूथपावडरने घासू शकतो. (टूथपेस्ट हवी जेल नसावं). चांदीच्या भांड्यांसाठी इतर लिक्विड क्लीनरही बाजारात उपलब्ध असतात.

लोखंडी तवा – पितांबरी वापरून तारेच्या घसणीने लोखंडी तवा उत्तम निघू शकतो. जास्त खराब झाला असेल तर लिंबाच्या फोडीनं (किंवा लिंबू जरा मीठात बुडवून) आधी पुसून घ्यायचं आणि नंतर साबणाने घासायचा. पूर्वी तवा घासायचा एक दगड मिळायचा. त्याने तवा उत्तम निघायचा फक्त तव्याला छर्रे पडायचे.

नॉनस्टीकची भांडी/तवे– ह्या नॉनस्टीकच्या भांड्यांना घासताना जोर लावता येत नाही. नॉनस्टीकचे तवे वापरून झाल्या झाल्या लगेच टीशू पेपरने पुसून घेतले तर त्यावरचं तेल/तूप शोषलं जातं. थंड झालेल्या तव्यावर तेल/तूपाचे थर/ डाग सेटल होत जातात आणि मग तवा स्वच्छ करणं अवघड जातं.

सर्व प्रकारात ज्याकुठल्या भांड्यांना सगळ्यात जास्त मेंटेनन्स लागत असेल तर ती म्हणजे तांब्या पितळीची भांडी. ही भांडी घासताना खूप कष्ट घ्यावे लागतात आणि त्या मानाने पटकन खराब होतात. बहुदा म्हणूनच ही भांडी रोजच्या वापरातून कालबाह्य झाली असावीत.
त्यानंतरची महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या घासण्या/स्पंज/ब्रशेस वेळोवेळी बदलणे. जुन्या खराब झालेल्या घासण्या वापरल्याने भांडी स्वच्छ निघत नाहीत.

भांड्यांना येणारा वास :

डिश लिक्विड किंवा भांड्यांसाठीचा साबण तयार करताना त्यातला विशिष्ठ सुगंध तयार करण्यासाठी मोठमोठ्या कंपन्या परफ्युमर्सचे सल्ले घेत असतात. परफ्युमर्सच्या म्हणण्यानुसार भांड्यांच्या साबणासाठीचा सुगंध जास्त काळ ‘सर्फेस’वर राहणार नाही अश्या पद्धतीचा molecular formula वापरावा लागतो आणि ह्याउलट कपड्यांच्या स्वच्छतेसाठीचा साबण तयार करताना तो सुगंध जास्त काळ ‘सर्फेस’वर राहील अश्या पद्धतीचा molecular formula वापरावा लागतो. भांड्यांच्या ‘सर्फेस’वर जर जास्त काळ सुगंध राहिला तर जेवताना आपल्याला तोच वास जास्त येऊ शकतो किंवा अन्नपदार्थांच्या वासात तो मिक्स होऊन काहीतरी वेगळाच किंवा विचित्र वास येऊ शकतो. म्हणून भांड्यांच्या साबणाचा किंवा डीशसोपचा वास खूप तीव्र आणि खूप काळ टिकणारा नसतो. त्यामुळे साबणाचा उपयोग हा फक्त भांडी स्वच्छ करण्यासाठी किंवा त्यातला तेलकटपणा घालवण्यासाठी होऊ शकतो. भांड्यांना येणारे अन्नपदार्थांचे वास जाण्यासाठी किंवा भांडी deodorised करण्यासाठी बेकिंग सोड्याचा वापर करतात. बेकिंग सोडा हा deodorise करणारा एक महत्वाचा एजंट आहे. त्यामुळे लसणाची पेस्ट करून ठेवलेला डबा आपण कितीही स्वच्छ घासला तरीही त्याला लसणाचा वास येतो. अश्यावेळी मीठ किंवा बेकिंग सोडा यांचा वापर करून बघितला तर नक्की उपयोग होतो. आणि अर्थातच भांड्यांना मोकळी हवा लागणं हेही तितकंच महत्वाचं आहे. बऱ्याचदा त्यानेही भांड्यांना येणारे वास कमी होतात.

घासलेली भांडी ठेवण्यासाठी:

सहसा आपल्याकडे घासलेली भांडी ठेवायला स्टीलची जाळी वापरली जाते. काही ठिकाणी प्लास्टिकचा टबसुद्धा वापरला जातो. हल्ली आपल्याकडे घासलेली भांडी निथळत ठेवण्यासाठी स्टॅंडसुद्धा मिळत आहेत. ह्यात ताटं ठेवण्यासाठी खाचा असतात आणि निथळलेलं पाणी खाली सांडू नये म्हणून एक ट्रेसुद्धा येतो.

भांडी ठेवण्यासाठी जाळी निवडताना :

१. जिथे दिवसातून एकदाच स्वयंपाक होतो अश्यावेळी स्वयंपाकाची एकूण भांडी कमी पडतात आणि ताटं, वाट्या चमचे त्या प्रमाणात जास्त असतात. अश्या वेळी ताटं ठेवण्यासाठी खाचा असणारं, चमचे अडकवण्यासाठी खाचा असणारं छोटंसं स्टॅंडसुद्धा चालू शकतं. घरात दोघंच जणं राहत असतील तर हे नक्कीच उपयोगी ठरू शकतं.

२. जर दोन वेळेला स्वयंपाक होत असेल, मोठं कुटुंब असेल किंवा घरात लहान मुलं असतील तर मात्र जास्त भांडी पडू शकतात. अश्यावेळी मोठ्ठा टब किंवा भांड्यांची जाळीची गरज असते.

ह्या भांड्यांच्या जाळीखाली जुनी कॉटनची साडी घडी करून ठेवावी किंवा पंचा ठेवावा. जेणे करून भांड्यांचं निथळलेलं पाणी शोषून घेतलं जाईल. भांड्यांची जाळी ओट्यावर डायरेक्ट ठेवल्याने ओट्याला जे चरे पडतात किंवा निथळलेल्या पाण्याचे डाग पडतात तेह पडणार नाहीत. हल्ली ह्या जाळीना खाली एक स्लाइडींग ट्रे असतो जेणेकरून भांड्यांचं निथळलेलं पाणी त्या ट्रे मध्ये पडेल.
घराला वेगळी ड्राय बाल्कनी असेल तर तिथे हा सर्व भांड्यांचा पसारा ठेवू शकतो. पण तसं नसेल तर त्यासाठी एक वेगळी विशिष्ठ जागा ठरवून घ्यायला हवी. शक्यतो ही जागा हवेशीर किंवा थोडी तरी हवा जाण्याजोगी असावी, नाहीतर एक विशिष्ठ वास घरात राहतो. (रात्रीच्यावेळी सगळी दारं खिडक्या बंद असतात त्यामुळे हा वास जास्त पसरत जातो.)

बहुतांश लोकांच्या मते भांडी घासणं हे अत्यंत कष्टाचं, त्रासाचं, बोअरिंग आणि नॉनग्लामारस काम आहे. मला भांडी घासायला फारसं आवडत नाहीत ह्याचं कारण वेगळं आहे. भांडी जास्त असतील तर उभं राहून पाठीला रग लागते ते सोडाच पण सगळं स्वच्छ आवराआवर करून बसलं तरी हाताला ओशट, खरकटा वास येत राहतो आणि मला तो अजिबात आवडत नाही. त्यामुळे भांडी घासते वेळी मी दोन गोष्टी करते ज्या माझ्या घरात सगळ्यांनाच विअर्ड वाटतात. पहिली गोष्ट म्हणजे जास्त भांडी असतील तर चक्क रबरचे ग्लोव्ज घालून भांडी घासते. हाताला सतत हार्श साबण लागून हात ड्राय पडतात, खरबूड खरबूड लागतात. (नेहमीच्या प्रमाणात माझ्या हाताला जरा जास्तच त्रास होतो. एकदा भांडी घासली तरी लगेच मला फरक जाणवायला लागतो, हाताची प्रचंड आग व्हायला लागते) त्वचेमधलं natural oilचं प्रमाण कमी होत जातं. दुसरं म्हणजे काचेची भांडी घासताना भांडी हातातून घसरत / निसटत नाहीत. क्वचितप्रसंगी चाकू, सुरी सारख्या अणकुचीदार गोष्टीमुळे हाताला जी इजा होते तीही होत नाही. नवीन आणलेल्या ह्या रबराच्या ग्लोव्जना रबराचा एक विशिष्ठ प्रकारचा वास येत असतो. अश्या वेळी त्यात थोडा बेकिंग सोडा घालून ठेवायचा. (बेकिंग सोडा हे कोणत्याही प्रकारच्या तीव्र वासांचं शोषण करण्याचं काम करतो.)

आज इथेच थांबते उद्या सिंकबद्दल आणि डिशवाॅशरबद्दल बोलूया. तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची भांडी घासताना काय काय प्रयोग करता ? तुमच्या टिप्स खाली कमेंट्समध्ये जरूर लिहा.

#घघराचा #नियोजनामागचेप्रयोजन #घासूनपुसूनस्वच्छ

Related Posts

आपल्या प्रतिक्रिया/ कॉमेंट आपण इथे नोंदवू शकता

Your email address will not be published.

https://teamradioshack.com/ https://lit.link/en/totoagung2slot https://linkby.tw/qdal88.slot https://heylink.me/totoagung-situs-slot-online-gacor-terbaik-terpercaya/ https://linklist.bio/daftar-slot-4d https://heylink.me/bocoran-slot-gacor-hari-ini-situs-judi-online-restoslot4d/ https://ffm.bio/daftar-restoslot4d https://linkby.tw/totoagung2slot https://new.c.mi.com/th/post/114045 https://instabio.cc/cantiktoto-link https://s.id/Slotgacor4DOfficial https://naturalhistorymag.com/artdepartment/freebet-tanpa-deposit/ https://instabio.cc/link-daftar-amintoto https://heylink.me/restoslot4d-situs-pay4d-resmi-paling-gacor-indonesia/ https://idolink.com/slotgacor4dofficial https://allmy.bio/IDN-Slot-online-amintoto https://linkby.tw/amintoto-link-alternatif https://naturalhistorymag.com/content/spaceman-pragmatic/ https://wlo.link/@restoslot4d_gacor https://mssg.me/amintoto-slot-online https://akangzeyus.com/ https://heylink.me/cantiktoto-bandar-slot-online-gacor-resmi-idnplay/ https://heylink.me/link-alternatif-slot-pay4d/ https://idolink.com/qdal88slot https://ffm.bio/cantiktoto_slot https://heylink.me/agen-slot-demo-pragmatic-terpercaya-qdal88/ https://heylink.me/totoagung2-situs-slot-online-resmi-gacor-terpercaya-menang/ https://heylink.me/qdal88-situs-slot-gacor-online-freebet-tanpa-deposit/ https://solo.to/totoagung-slot https://lit.link/en/qdal88link https://heylink.me/restoslot4d-daftar-situs-slot-gacor-online-pay4d/ https://idolink.com/slothoki https://antartidargentina.com/ https://s.id/amintoto-slot-online https://blog.motorola.de/wp-content/slot-gacor-4d/ https://lynk.id/qdal88_slot_pulsa https://lynk.id/daftar_slot_4d https://instabio.cc/totoagung2-slot https://linkr.bio/restoslot4d-login https://idolink.com/totoagung2slot https://heylink.me/link-alternatif-slot-online-gacor-cantiktoto/ https://heylink.me/situs-slotgacor-4d-gampang-menang-maxwin/ https://ffm.bio/amintoto_official https://naturalhistorymag.com/content/slot-gacor/ https://lynk.id/totoagung_link https://allmy.bio/Slotgacor4dOfficial https://heylink.me/link-slot-gacor-totoagung2-pusat-game-terlengkap/ https://s.id/daftar-restoslot4d https://lynk.id/cantiktoto https://heylink.me/link-alternatif-situs-slot-gacor-online-amintoto/ https://heylink.me/slotgacor4d-situs-slot-online-gampang-menang-resmi-pay4d/ https://motivasiagung.com/ https://allmy.bio/cantiktoto-slot https://heylink.me/totoagung-situs-slot-online-resmi-pusat-pragmatic-play/ https://replit.com/@totoagung2slot https://mssg.me/cantiktoto_slot https://ffm.bio/qdal88_slot4d https://heylink.me/link-alternatif-resmi-restoslot4d-terbaik-gampang-menang https://wlo.link/@totoagung_slot https://lit.link/en/amintotoslotonline https://news-business.co.uk/slot-gacor-4d/ https://heylink.me/totoagung-situs-slot-online-resmi/ https://heylink.me/cantiktoto-situs-slot-online-terpercaya-gacor-lisensi-resmi/ https://heylink.me/agen-slot-pay4d/ https://jemi.so/amintoto-situs-slot-online-terpercaya https://new.c.mi.com/th/post/113199 https://raizeducacao.com.br/freebet-slot/ https://linkby.tw/cantiktotolink https://allmy.bio/qdal88-slot https://lynk.id/totoagung_slot https://jemi.so/cantiktotositusjudislotonlineterpercayaslotgacorpragmaticplayterbaikdiindonesia https://brainwavelove.com/ https://bandungheritage.org/ https://lynk.id/amintotoofficial https://solo.to/amintoto_official https://replit.com/@cantiktotogacor https://replit.com/@totoagungslot https://allmy.bio/totoagung2-slot https://linklist.bio/amintoto_link_daftar https://slotgacor4d.com/ https://ffm.bio/totoagung2_slot https://heylink.me/situs-slot-gacor4d-resmi-mudah-menang/ https://heylink.me/bocoran-situs-slot-gacor-gampang-menang-cantiktoto/ https://new.c.mi.com/th/post/116758 https://linklist.bio/qdal88-slot https://linkby.tw/totoagung-slot https://www.printersupportpro.us/blog/wp-content/uploads/slot-idn/ https://www.soulrichwoman.com/slotgacor4d/ https://skillscanada.bc.ca/idn-slot/ https://replit.com/@Slotgacor4doff https://linklist.bio/totoagung2_slot https://idolink.com/cantiktotoslot https://heylink.me/situs-slot-gacor-4d-gampang-menang/ https://heylink.me/daftar-slot-online-gacor-akun-vip-qdal88/ https://linktr.ee/totoagung2 https://naturalhistorymag.com/htmlsite/slot88-gacor/ https://mssg.me/qdal88-situs-judi-slot-paling-gacor-hari-ini https://heylink.me/slot-demo-pragmatic-qdal88-gratis-tanpa-deposit/ https://s.id/cantiktoto_slot https://linkby.tw/slotgacor4d.official https://heylink.me/cantiktoto/ https://heylink.me/link-alternatif-slot-pay4d/ https://linkr.bio/qdal88-slot4d https://idolink.com/amintotodaftarslotonline https://linklist.bio/Slotgacor4DOfficial https://linklist.bio/totoagung-slot https://heylink.me/qdal88/ https://meelink.bio/slot-gacor-maxwin https://mssg.me/totoagung2_slot https://heylink.me/daftar-slot-gacor-vip-khusus-situs-totoagung2/ https://s.id/totoagung-slot https://agungsport.com/ https://jemi.so/restoslot4dgacor https://heylink.me/totoagung_situs_deposit_pulsa/ https://produkvvip.com/ http://ptos.kimia.gov.my/css/sass/slot-pulsa/ https://heylink.me/qdal88.gampang.hoki/ https://heylink.me/SlotGacor4D/ https://heylink.me/bocoran-slot-gacor-pagi-siang-malam-hari-ini-amintoto/ https://instabio.cc/daftar-slot-4d https://solo.to/totoagung2_slot https://heylink.me/slot-gacor-online-rtp-tertinggi-situs-judi-amintoto/ https://skskismizamanli.cumhuriyet.edu.tr/image/demo/slot-pulsa/ https://wlo.link/@cantiktoto_slot https://lit.link/slotgacor4dnew https://ffm.bio/slotgacor4dofficial https://replit.com/@Resto4d https://solo.to/qdal88-slot https://heylink.me/totoagung2-situs-judi-slot-online-gacor-indonesia/ https://heylink.me/amintoto-daftar-situs-slot-online-gacor-indonesia/ https://heylink.me/restoslot4d-rtp-live-slot-gacor-tertinggi-hari-ini/ https://instabio.cc/Slotgacor4DOfficial https://allmy.bio/totoagung-slot https://naturalhistorymag.com/htmlsite/bo-slot-gacor/ https://linkby.tw/daftar_restoslot4d https://idolink.com/totoagungslot https://solo.to/resto-slot-4d https://heylink.me/link-slot-online-gacor-terpercaya-totoagung/ https://heylink.me/agen-slot-gacor-terkuat-totoagung-gampang-menang/ https://replit.com/@qdal88link https://ffm.bio/totoagung-slot https://heylink.me/cantiktoto-link-slot-online-gacor-terpercaya-resmi-idnplay/ https://solo.to/slotgacor4dofficial https://mssg.me/totoagung-situs-slot-online-paling-gacor https://heylink.me/link-alternatif-slot-freebet-qdal88/ https://instabio.cc/totoagung-slot https://instabio.cc/qdal88-slot https://lit.link/en/restoslot4dterpercaya https://heylink.me/amintoto-situs-slot-online-terpercaya-gampang-menang/ https://mssg.me/slotgacor4dofficial http://bpp346.bpp.police.go.th/slot-gacor-maxwin/ https://heylink.me/agen-slot-pay4d/ https://lit.link/en/cantiktotolink https://replit.com/@AmintotoDaftar https://mssg.me/slot-hoki-restoslot4d https://lynk.id/totoagung2_slot https://lynk.id/slotgacor4dofficial https://heylink.me/situs-slot-demo-gratis-totoagung2/