Close
 • Gha Gharacha

शेगडी विकत घेताना

आपण अनेक बदलांचे साक्षीदार असतो.. अगदी आपल्या नकळतपणे.. पूर्वी आजी चुलीवरती स्वयंपाक करायची मग हळूहळू स्टोव्ह वापरायला सुरुवात झाली. त्यानंतर आई दोन बर्नरची शेगडी वापरायला लागली आणि आता आपण चार बर्नरची शेगडी वापरतो. किती गमतीदार वाटतो नं हा प्रवास? आणि प्रत्येका गोष्टीची वेगळी खासियत आहे. भाकरी जितकी छान चुलीवर भाजली जाते तितकी छान शेगडीवर भाजता येत नाही. भाजून झाल्यावर तव्यावरून उतरवल्यानंतर चुलीला लागून उभी करून ठेवली की भाकरी छान खरपूस होते. चुलीवर शिजवलेल्या पदार्थांना एक वेगळाच सुगंध असतो… खूप जणांना तो आवडतो.. खूप जणांना तो नॉस्टालजीक करतो. (आता पुन्हा एकदा चुलीवरच्या गोष्टींचं कौतुक होऊ लागलाय ते सोडा… 😉 ) पण कितीही नाही म्हटलं आणि जुन्या गोष्टींची आवड असली तरी काही गोष्टी काळानुरूप स्वीकाराव्या लागतात. गॅस ही त्यातलीच एक गोष्ट आहे. आज आपण त्याबद्दलच बोलणार आहोत. गॅसची शेगडी विकत घेताना मी काय काय विचार केला आणि मला काय काय माहिती मिळाली हे आज तुमच्यासमोर मांडणार आहे.

शेगडीचे मुख्य प्रकार :

१.बिल्ट इन किंवा फ्री स्टँडिंग :
बिल्ट इन प्रकारामध्ये योग्य आकारात ओटा कट करतात आणि त्या खाचेमध्ये शेगडी बसवतात. अर्थात ह्याची तयारी आधीपासूनच करावी लागते. तो ओटा कट करण्यासाठी बाजूने योग्य सपोर्ट असावा लागतो. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला शेगडी बाजूला करून ओट्यावर पाणी टाकून ओटा स्वच्छ करायची सवय असते. ह्या प्रकारांत मात्र तसं करता येत नाही कारण शेगडी ओट्यामध्ये बसवलेली असल्याने त्यात पाणी गेल्यास ती खराब होऊ शकते. फ्री स्टँडिंग प्रकारात शेगडी मनाप्रमाणे हलवता येते कधी कधी खूप वेळाचे काम असल्यास काही बायकांना शेगडी जमिनीवर घेऊन मग काम करण्याची सवय असते. अश्या वेळी ही शेगडी आरामात खाली घेता येते.

२.इलेक्ट्रिक किंवा एल पी जी :
इलेक्ट्रिक शेगडीमध्ये वेट्रोसिरामिक बिल्टइन किंवा इंडक्शन असे दोन प्रकार असतात. वेट्रोसिरामिक बिल्टइनसाठी साधारण १५ AMP पावर लागते आणि ह्यासाठी कोणतेही वेगळ्या प्रकारची भांडी लागत नाहीत. इंडक्शन हे फ्री स्टँडिंग प्रकारात मोडते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्यासाठी फेरोमॅग्नाटिक बेस असणारी विशिष्ट भांडी वापरावी लागतात. पूर्वीच्या काळी इलेक्ट्रिक कॉइल असणारी शेगडी किंवा कूकटॉप असायचे आता ते प्रकार फारसे बघायला मिळत नाहीत.

३.कुकिंग रेंज :
वरच्या बाजूला शेगडी किंवा कूक टॉप आणि त्याच्या खाली ओव्हन असा हा सेट असतो. आपल्याकडे ह्याचा मुख्य तोटा जाणवतो तो म्हणजे स्वयंपाकघरातील खूप मोठी आणि महत्वाची जागा अडून बसते आणि स्टोअरेजसाठी अडचण निर्माण होते. जर स्वयंपाकघरात जास्त जागा उपलब्ध असेल तर यासारखं सुख नाही.

बर्नरचे प्रकार :
भारतीय स्वयंपाकाच्या विशिष्ट पद्धती आहेत. रोजच्या स्वयंपाकात असणाऱ्या फोडण्या करण्यासाठी तेलाचं योग्य तापमान गरजेचं असतं. तेल तापल्याशिवाय फोडणी व्यवस्थित होत नाही आणि जिरे मोहरी टाकल्यानंतर ते जाळून जाऊ नये म्हणून आपण विशिष्ट तापमान मेंटेन करत असतो. तसंच फुल्क्यांचंसुद्धा. फुलके/भाकरी भाजण्यासाठी नंतर तवा बाजूला करून जेव्हा फ्लेमवर फुलके भाजतो तेव्हा विशिष्ट फ्लेम लागते जेणेकरून संपूर्ण फुकला भाजला जाईल. त्यामुळे आपल्याकडे अनुरूप बर्नर सेटिंग असणे खूप गरजेचे आहे.

१.ओपेन बर्नर – क्लोज्ड बर्नर :
ओपेन बर्नर हे शक्यतो कमर्शिअल किचनसाठी वापरलं जातं आणि क्लोज्ड बर्नर हे घरगुती वापरासाठी वापरलं जातं.

२.इंडिअन ब्रास बर्नर :
अल्युमिनियमचे बर्नर्स हे लवकर गरम होतात आणि लवकर थंड होतात. त्यामुळे क्विक कुकिंगसाठी ते वापरले जावेत म्हणजे थोड्याचवेळात पदार्थ शिजून पूर्ण होईल आणि कमी तापमानात शिजू शकेल अश्या प्रकारच्या पदार्थांना हे अल्युमिनियमचे बर्नर्स चालू शकतात. पण ते ब्रास बर्नर इतके टिकाऊ नसतात.त्यामुळे भारतीय स्वयंपाकाच्या पद्धतीला लक्षात घेऊन ब्रास बर्नर तयार करण्यात आले आहे आणि ते टिकाऊ असतात.

३.इटलियन/युरोपिअन बर्नर :
हे बर्नर स्लो कुकिंग्साठी प्रसिद्ध आहेत. भारतीय स्वयंपाकाच्या पद्धतीच्यादृष्टीने हे बर्नर वापरू नयेत असे सुचवले जाते.

४.मल्टी फ्लेम कंट्रोल बर्नर (MFC बर्नर) :
ह्या प्रकारच्या बर्नरला दोन फ्लेम रिंग्स असतात. बर्नरच्या आतल्या बाजूची फ्लेम रिंग आणि बाहेरच्या बाजूची फ्लेम रिंग एकाच नॉबच्या सहाय्याने कमी जास्त करता येते. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हाय फ्लेम आणि लो फ्लेम्साठी हा एकच बर्नर वापरता येऊ शकतो. त्यामुळे भारतीय स्वयंपाकात महत्वाची असणारी फोडणी आणि भाकरी/ फुलका गॅसवर भाजण्यासाठी ह्या प्रकारचे हे बर्नर्स सोयीचे असतात. हे बर्नर्स शक्यतो ब्रासचे असतात. हल्ली बिल्टइन हॉबमध्येसुद्धा बरेच बदल झाले आहेत आणि भारतीय स्वयंपाकाला गरजेचे असणारे बदल लक्षात घेऊन बर्नर तयार करण्यात आले आहेत. MFC बर्नरवर स्वयंपाक लवकर होत असल्याने इंधन कमी खर्च होते असा सगळ्या कंपन्याचा दावा आहे.

५.SABAF बर्नर्स :
SABAF ह्या कंपनीने तीन रिंग बर्नर तयार केले आहेत. त्यामुळे त्यांना SABAF बर्नर म्हणतात. ह्या बर्नरमुळे फ्लेम समप्रमाणात सगळीकडे पसरते आणि अन्न उत्तम प्रकारे शिजवले जाते.

शेगडीची स्वच्छता :
सगळ्यात पहिल्यांदा इंधनाचा पुरवठा करणारा जेट/ नॉब बंद करायचा. बर्नर आणि त्यावरचे ग्रीड गरम नाहीत ह्याची खात्री करून घ्यायची. गॅसची स्वच्छता करताना सगळ्यात आधी बर्नर आणि स्टॅन्ड (ग्रेट्स) साबणाच्या पाण्यात (गरम पाण्यात) भिजवत ठेवा. एका मोठ्या पातेल्यात किंवा डबलबोल सिंक असल्यास त्यापैकी एका बोलमध्ये साबणाचं पाणी करून त्यात स्टॅन्ड आणि बर्नर ठेवू शकता. अर्ध्या तासानंतर ते बाहेर काढून घासणीने/ टूथब्रशने घासून घ्या (वेळच्या वेळी बर्नर स्वच्छ केले नाहीत तर त्यात घाण साठून राहते आणि त्याची छिद्र बुजायला लागतात. बर्नर स्वच्छ करण्यापूर्वी गॅस एकदा मोठ्या आचेवर करून बघायचा. मोठ्या आचेवर केलं की कोणकोणती छिद्र बुजायला लागली आहेत याचा अंदाज येतो आणि आपण तश्या पद्धतीने स्वच्छ करू शकतो). त्यानंतर एका मोठ्या जाड फडक्यावर हे स्वच्छ झालेले बर्नर पाणी निथळण्यासाठी ठेवून द्या. पूर्ण वाळल्याशिवाय बर्नर शेगडीवर ठेऊ नका. (जर साबण आणि पाण्याने बर्नर स्वच्छ निघाले नाहीत तर गरम पाण्यात व्हेनिगर घालून त्यात बर्नर भिजवत ठेवा). बर्नर खूप वेळ ठेऊनही जर त्यात पाण्याचे अंश दिसत असतील तर जोरात फुंकर मारून छोट्या छोट्या छिद्रांमधून पाणी काढून टाका. खरकटे हात लागून लागून गॅसची बटणंसुद्धा खूप खराब झालेली असतात. त्यामुळे गॅसची बटणं निघत असतील तर तीदेखील काढून स्वच्छ करावी कारण त्याच्याखाली घाण जाऊन बसते.
एक वाटी पाण्यात २ चमचे डिश लिक्वीड घालून तयार केलेलं हे क्लिनर गॅसवर स्प्रे करा. ४-५ मिनिटे तसंच राहू द्या. ह्यामुळे वाळलेले डाग जरासे ओलसर होतात आणि पटकन निघतात. डाग काढण्यासाठी स्पंजच्या मागच्या हिरव्या बाजूने/स्क्रब ने थोडं हलक्या हाताने घासा. कोपऱ्यात घाण साठून राहते अश्यावेळी टूथब्रशचा वापर करा. (ब्रशवर क्लिनर मारा आणि ब्रशने डाग पडलेल्या भागावर घासा). बाजारात गॅससाठी म्हणून खूप बारीक ब्रश पण उपलब्ध असतो तो सुद्धा वापरू शकता. आता अत्यंत सॉफ्ट स्पंजने किंवा सुती फडक्याने हे पुसून घ्या. जर ग्लास कूकटॉप असेल तर ग्लास क्लीनरनेच स्वच्छ करा. ग्लास जर सुती कपड्याने पुसून घेतली तर कपड्याची सुतं लागतात. त्यामुळे शक्यतो स्पंज किंवा ग्लास पुसण्यासाठी असणाऱ्या विशिष्ट नॅपकिन्सचा वापर करा. इग्नायटर किंवा सेन्सरची काळजी घ्या. घासता घासता ते खराब होणार नाही ह्याची काळजी घ्या.
शेगडीच्या स्वच्छतेची ही सर्वसाधारण पद्धत आहे. परंतु, जर मॅन्युअलमध्ये काही विशिष्ठ गोष्टी सांगितल्या असतील तर त्याच पद्धतीने शेगडीची स्वच्छता करावी. काही कंपन्या Annual maitenance Contract पण घेतात. गरज असल्यास त्यांच्याकडून ह्या सर्व्हिसचा नक्की उपयोग करुन घ्या.

काही टिप्स :

१.शेगडी विकत घेताना त्याच्या मटेरीअलचा नक्की विचार करावा.
बर्नर : – बर्नर शक्यतो ब्रासचे असावेत
ग्रीड (बर्नरवर ठेवायचे सपोर्ट/ स्टँड): – कास्ट आर्यन किंवा एनामल कोटिंगचे असावेत. पावडर कोटिंग असणारे ग्रीड टाळावेत. (कास्ट आर्यन सगळ्यात उत्तम आणि टिकाऊ असते)
शेगडी : – जर स्टेनलेस स्टीलची असेल तर ते नॉन रस्टिंग ग्रेडचे असावे. हल्ली त्यात अँटीस्क्रॅच स्टेनलेस स्टील असा प्रकार पण उपलब्ध असतो. त्याचा नक्की विचार करावा.
जर ग्लासची शेगडी असेल तर तर टेम्पर्ड किंवा सेफ्टी ग्लास असावी. सलग दोन तास शेगडी वापरल्यास निर्माण होणारे तापमान शेगडीला त्रासदायक ठरणार नाही याची खात्री करून घ्यावी. दुर्दैवाने जर काही कारणांमुळे ही काच फुटली तरी तिचे टोकदार तुकडे होत नाहीत आणि ते तुकडे सगळीकडे पसरत नाहीत. काचेला तडा जातो आणि तुकडे तिथेच जमा होतात.

२.शेगडीचा आकार: शेगडीचा आकार ठरवताना आपल्या ओट्याची लांबी रुंदी याचा विचार करावा लागतो. शेगडीमुळे ओट्याची बरीचशी जागा व्यापून जाते. शेगडी ठेवल्यावर आपल्याला काम करण्यासाठी पुरेशी जागा ओट्यावर असायला हवी. आपल्याकडे किती माणसांचा स्वयंपाक होतो आणि त्यासाठी कोणत्या आकाराची भांडी वापरली जातात ह्यावरसुद्धा शेगडीच्या बर्नरचा आकार ठरवावा लागतो आणि पर्यायाने शेगडीचा. पूर्वी असं म्हटलं जायचं की घरात किती माणसं आहेत त्यावर शेगडीच्या बर्नरची संख्या ठरवावी. परंतु, हल्लीच्या सकाळच्या गडबडीच्या वेळेत तीन किंवा चार बर्नरची शेगडी जास्त उपयुक्त ठरते. शेगडीचा आकार सेंटीमीटरमध्ये मोजतात. साधारणपणे ६०, ७५, ८०, ९० अश्या आकारात शेगड्या उपलब्ध असतात. बिल्ट इन हॉब बसवत असू तर शेगडीची खोलीसुद्धा लक्षात घ्यायला हवी आणि त्या अंदाजाने त्याखाली असणाऱ्या ड्रॉवरची मांडणी करायला हवी.

३.बर्नरसंख्या आणि त्याची मांडणी : जर चार बर्नरची शेगडी घेत असू तर त्यात वेगवेगळे आकार असतात. दोन पुढच्या बाजूला आणि दोन मागच्या बाजूला (एकामागे एक अश्या प्रकारे दोन) बर्नर असतात. एकावेळी जर तीन पदार्थ करत असू तर ह्या शेगड्या वापरण्यासाठी थोड्या अवघड जातात. कारण मागच्या रांगेत असणाऱ्या पदार्थांना हलवण्यासाठी किंवा काही करण्यासाठी अवघड जाते. फोडणी टाकून फक्त उकळत ठेवण्यासाठी मागच्या बर्नरचा वापर होऊ शकतो. अश्या प्रकारच्या शेगडीवर दोन मोठी पातेली (एका समोर एक अशी) मावत नाहीत. मग अश्यावेळी इंग्रजी ‘सी’ शेपच्या चार बर्नरच्या शेगडीचा (खाली फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे ) उपयोग होतो. एकावेळी दोन मोठी पातेली ठेऊ शकतो किंवा एक मोठं पातेलं आणि तवा एकावेळी ठेवू शकतो. ह्या शेगड्यांचा आकार साधारण ८० ते ९० सेंटीमीटर इतका असतो. जर ओट्यावर जास्त जागा नसेल तर मात्र ह्या प्रकारच्या शेगडीमुळे अडचण होऊ शकते.

४. हल्लीच्या शेगडयांना सेन्सॉर असतात. स्वयंपाक करताना जर काही फ्लेमवर सांडलं किंवा ओतू गेलं तर फ्लेम आपोआप बंद होते. जर आपण निवडलेल्या शेगडीला ही सोय नसेल तर काही कंपन्या जादा रक्कम भरून फ्लेम फेल्युअर डिव्हाइस बसवून देतात. ह्याचा नक्की विचार करावा.

५.शेगडीसाठी वापरण्यात येणाऱ्या इंधनाच्या प्रकारावरून त्याच्या जेटचा प्रकार बदलत असतो. त्यामुळे आपण एल पी जी /नॅच्युरल गॅस वापरत असू तर शेगडी विकत घेताना डीलरला ही माहिती सांगितली तर तो आपल्याला योग्य शेगडी देऊ शकतो.

६.फ्लेमचा रंग हा एक प्रकारचा इंडिकेटर असतो. आपण वापरत असणाऱ्या इंधनानुसार फ्लेमचा रंग निळा आणि टोकाशी हलकासा पिवळा असायला हवा. जर या रंगत बदल होत असेल तर शेगडीमध्ये/ बर्नरमध्ये काहीतरी अडचण आहे असे समजायला हरकत नाही. त्यामुळे तात्काळ कंपनीच्या माणसाला कळवायला हवं.

शेगडीच्या माहितीवरचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा. पुन्हा भेटू लवकरच…!!

3 thoughts on “शेगडी विकत घेताना

 1. Aucreft

  Does honey increase sperm viagra type pills?
  It is completely in the pink to ejaculate more or less than three times a week! The usual ejaculation frequency payment men ranges from two to seven times a week, which is a unbelievably afield gap. So it’s legible that there’s no legal or recidivate b fail answer, nor are there any pithy robustness risks associated with ejaculation frequency.

 2. SoInedy

  Q: Is it normal for a guy to release quickly?
  A: There’s no implacable and firm in the main when it comes to how many erections a person should get. People with penises be enduring an generally of 11 erections per period and three to five more each vespers all the time, but harry is different. viagra over the counter walgreens.

Leave a Reply to Anonymous Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!